‘दी काश्मीर फाईल्स’वर टीका करणारे नदव लॅपिड डाव्या विचारांचे

81

गोव्यात झालेल्या ५३व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (IFFY २०२२) ज्युरी बोर्डाचे प्रमुख नदव लॅपिड यांनी काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराचे चित्रण करणाऱ्या ‘दी काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला ‘अपप्रचार’ आणि ‘अश्लील’ म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर सर्वत्र टीका होत आहे. नदव लॅपिड हे वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे. त्यांनी इस्त्रायल देशावरही टीका केली होती, इस्त्राईल देशाचे वर्णन ‘आजारी आत्मा’ असे केले होते.

इस्राईल देश आजारी आत्मा 

वास्तविक, नदव लॅपिड हा डाव्या विचारसरणीचा इस्रायली चित्रपट निर्माता आहे. त्याने आतापर्यंत एकूण 13 चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. नदव लॅपिडकडे इस्रायलचा द्वेष करणारी व्यक्ती म्हणून पाहिले जाते. ज्यूंच्या एकमेव राष्ट्र आणि मातृभूमीबद्दल नदाव लॅपिड यांना अभिमान कमी तर इस्रायलचा शत्रू पॅलेस्टाईनविषयी आस्था आहे. एका मुलाखतीत लॅपिडने त्याच्या ‘सिनोनिम्स’ चित्रपटाबद्दल बोलताना, हा चित्रपट इस्रायलच्या आत्म्याबद्दल बोलतो. इस्रायलचा आत्मा एक आजारी आत्मा आहे. इस्रायलच्या अस्तित्वाच्या मुळाशी काहीतरी चुकीचे आहे. केवळ बेंजामिन नेतन्याहू (इस्रायलचे पंतप्रधान) चुकीचे आहेत असे नाही. उलट येथील तरुणांना इस्रायली असल्याचा अभिमान वाटतो, असेही लॅपिड म्हणाले.

(हेही वाचा The kashmir Files : IFFI 2022 चे ज्युरी नदव लॅपिड यांना इस्राईलनेही सुनावले )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.