Nafed Onion Price : नाफेडकडून सामान्य नागरिकांना मिळालं दिवाळी गिफ्ट; २५ रुपये किलोने मिळणार कांदा

121
Nafed Onion Price : नाफेडकडून सामान्य नागरिकांना मिळालं दिवाळी गिफ्ट; २५ रुपये किलोने मिळणार कांदा

भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ लिमिटेड म्हणजेच नाफेड कडून सामान्य नागरिकांना दिवाळीचं खास गिफ्ट मिळालं आहे. त्यानुसार आता नागरिकांना २५ रुपये किलोने (Nafed Onion Price) कांदा मिळणार आहे.

अधिक माहितीनुसार, ऐन दिवाळीत कांद्याचे (Nafed Onion Price) भाव कडाडले आहेत. अशावेळी जनतेला सवलतीच्या दरात कांदा उपलब्ध व्हावा यासाठी नाफेडकडून वेगवेगळ्या ठिकाणी विक्री केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांवर नागरिकांना २५ रुपये किलो दराने कांदा दिला जात आहे.

(हेही वाचा – Jammu Kashmir Diwali : तब्बल 75 वर्षांनी मंदिरात साजरी झाली दिवाळी)

यासाठी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई व पनवेलमध्ये १०० ठिकाणी कांदा विक्री केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. मोबाइल व्हॅनद्वारे हा रास्त दरातील कांदा विक्री करण्यात येत आहे. (Nafed Onion Price)

(हेही वाचा – Telangana Election 2023 : तेलंगणाच्या निवडणुकीत कुटुंबवादाचा पूर)

सद्यस्थितीत २५ विक्री केंद्रांच्या माध्यमातून हा कांदा नागरिकांना उपलब्ध होत आहे. येत्या काळातही सवलतीच्या दरातील कांदा विक्री केंद्र १०० ठिकाणी सुरू करण्यात येणार आहेत. (Nafed Onion Price)

नाफेडच्या माध्यमातून सवलतीच्या दरातील विकल्या जाणाऱ्या कांद्यामुळे नागरिकांना दिलासा मिळत आहे. केंद्र सरकारच्या किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत ग्राहक कल्याण मंत्रालय वेगवेगळ्या ग्राहक कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून बाजारपेठेत हस्तक्षेप करत असते. (Nafed Onion Price)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.