Nafed Onion Scam : नाफेड घोटाळ्याची पीएमओने घेतली दखल

नाफेडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची पिंपळगाव बसवंत येथे भेट

89
Nafed Onion Scam : नाफेड घोटाळ्याची पीएमओने घेतली दखल

मागील काही दिवसांपासून नाफेडचा कांदा खरेदी घोटाळा चर्चेत असून आता त्याची थेट पंतप्रधान कार्यालयाने दखल घेतली आहे. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी नाफेडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पिंपळगाव बसवंत येथील नाफेडच्या कार्यालयात भेट दिली. (Nafed Onion Scam)

(हेही वाचा – Crime News : चोरीच्या बाईक्सला जीपीएस लावून विकायचे; पुन्हा तीच बाईक चोरी करून तिसऱ्याला विकायचे)

केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या ग्राहक संरक्षण विभागाकडून ग्राहकांना दिलासा देण्यासाठी नाफेड एनसीसीएफ च्या माध्यमातून कांद्याची खरेदी करून कांद्याचे भाव वाढले की तो कांदा बाजारात आणत कांद्याचे बाजार भाव नियंत्रणात ठेवले जातात. या उद्देशाने यंदा पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यात आला होता पण या कांदा खरेदीत घोटाळा झाल्याची तक्रार येवल्यातील शेतकऱ्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडे केली असून २०१७ पासून आतापर्यंत अडीच हजार कोटी रुपयांचा घोटाळा कांदा खरीतून झाला असल्याचे सांगत २४ प्रश्न उपस्थित केले आहे. (Nafed Onion Scam)

(हेही वाचा – लेस्टर (इंग्लंड) येथे हिंदूविरोधी दंगल भडकवणारा Majid Freeman याला कारावास)

या तक्रारीची दखल पंतप्रधान कार्यालयाने घेतली आणि नाफेडच्या वरिष्ठ अधिकारी विना कुमारी, विनय कुमार हे अधिकारी थेट नाफेडच्या पिंपळगाव बसवंत येथील कार्यालयात दाखल होत तक्रारदार शेतकरी गोरख संत तर पिंपळगाव बसवंत येथे पंतप्रधानांच्या सभेत थेट प्रश्न करणारा किरण सानप यांच्याशी तब्बल ४० मिनिटे संवाद साधला. यावेळी अधिकाऱ्यांनी तक्रारी बाबत पुरावे ही मागितले शेतकरी संवादानंतर माध्यम प्रतिनिधी आल्याची माहिती मिळताच नाफेडचे चौकशीसाठी आलेले अधिकारी यांनी काढता पाय घेतल्याने नाफेडच्या कांदा घोटाळ्यासह या चौकशीबाबतही तक्रारदार शेतकरी गोरख संत याने प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. (Nafed Onion Scam)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.