Nagpur Accident : हिट अँड रनच्या घटनांनी नागपूर हादरलं! ४८ तासांत ६ जणांनी गमावले प्राण

145
Nagpur Accident : हिट अँड रनच्या घटनांनी नागपूर हादरलं! ४८ तासांत ६ जणांनी गमावले प्राण
Nagpur Accident : हिट अँड रनच्या घटनांनी नागपूर हादरलं! ४८ तासांत ६ जणांनी गमावले प्राण

गेल्या काही दिवसांत हिट अँड रनच्या (Nagpur Accident) घटनांनी संपूर्ण राज्य हादरुन गेलं आहे. पुणे पोर्शे अपघातानंतर (Pune Porsche Accident) संपूर्ण राज्यभरातील हिट अँड रनच्या घटनांनी काळजाचा ठोका चुकवला आहे. एकीकडे मुंबईतील हायप्रोफाईल हिट अँड रनच्या घटनेनं संपूर्ण राज्य हादरुन गेलं आहे. तर, दुसरीकडे नागपुरात एकापाठोपाठ एक होणाऱ्या हिट अँड रनच्या घटनांनी प्रशासनाचंही टेन्शन वाढवलं आहे.

48 तासांत 6 नगरिकांचा मृत्यू

मंगळवारी, नागपुरात वेगवेगळ्या भागांत हिट अँड रनच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या होत्या. त्यात दोघांचा मृत्यू झाला होता. पहिली घटना कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली, ज्यात भावेश भरणे या तरुणाचा मृत्यू झाला आहे. तरुण दुचाकीने जात असताना ट्रकने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालक पळून गेला. तर दुसरी घटना वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. प्रकाश महंत हा भांडेवाडी परिसरातून तरुण पाई जात असताना अज्ञात वाहनानं त्याला धडक दिली त्यात त्याचा मृत्यू झाला. गेल्या 48 तासांत झालेल्या वेगवेगळ्या अपघातात एकूण 6 नगरिकांचा मृत्यू झाला आहे. ज्यात मृत्यू झालेले पाचजण हे 30 वयोगटाच्या खालचे आहेत. (Nagpur Accident)

60 वर्षांच्या वृद्ध व्यक्तीला भरधाव बसने दिली धडक

नागपुरात सायकलवरुन जात असताना मंगळवारी एका 60 वर्षांच्या वृद्ध व्यक्तीला एका भरधाव बसने धडक दिली. व्यक्तीचा तोल जाऊन व्यक्ती खाली कोसळली. बस भरधाव असल्यामुळे सायकलवरुन पडलेली वृद्ध व्यक्ती बसच्या चाकाखाली आली. या अपघातात व्यक्ती गंभीर जखमी झाली. जखमी व्यक्तीला तात्काळ उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं होतं. पोलिसांना सदर बसची ओळख पटली असून बसचालकाचा शोध सुरू असल्याची माहिती मिळत आहे. (Nagpur Accident)

रेल्वे अधिकाऱ्याला कारनं उडवलं

गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत अपघात घडला असून कारच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला आहे. अपघातामध्ये दिनेश खैरनार या तरुणाचा कारच्या धडकेत मृत्यू झाला आहे. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतही हिट अँड रनची घटना घडली. तसेच मॉर्निंग वॉक करणाऱ्या प्रवीण गांधी या रेल्वे अधिकाऱ्याला कारनं उडवलं आहे. दोन्ही घटनांमध्ये चालक घटनेनंतर फरार झाल्याचं समोर आलं आहे. संबंधित रेल्वे अधिकाऱ्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Nagpur Accident)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.