नागपूरमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. नागपूर- कामठी मार्गावर ट्रॅव्हल्स आणि ऑटो रिक्षामध्ये जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात लष्करातील २ जवानांचा मृत्यू झाला, तर इतर ६ जवान गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी, (१६ जून) सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नागपूर कामठी मार्गावर ट्रॅव्हल्स आणि ऑटो रिक्षामध्ये भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. यावेळी रिक्षामधून सैन्याचे जवान कामठी येथील सैन्याचा डेपो (कॅन्टोन्मेंट) येथे जात होते. या दुर्घटनेत २ जवान हुतात्मा झाले.
(हेही वाचा – MNS : मनसेच्या इंजिनात कार्यकर्त्यांचे इंधन पडते कमी)
भरधाव ट्रॅव्हल्सने धडक दिल्याने ऑटो रिक्षा फेकली गेली. या अपघातात ६ ते ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यांपैकी २ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समोर आले आहे.
#WATCH | Maharashtra: Two jawans of the Indian Army died and 7 including 6 jawans and an auto driver injured after a speeding private bus collided with an auto-rickshaw at Kanhan River Bridge in Nagpur, today, evening: Pramod Pore, Police Inspector, Old Kamptee PS pic.twitter.com/VORBxJGNiJ
— ANI (@ANI) June 16, 2024
दरम्यान, या अपघातावेळी बसमधून अनेक प्रवासी प्रवास करत होते. या अपघातानंतर बस चालक अपघातस्थळावरून फरार झाला. यानंतर संतप्त जमावाने बसच्या काचा फोडल्या तसेच महामार्गावर रास्ता रोकोही करण्यात आला. ज्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community