समृद्धी महामार्गावरुन जाणार असाल तर आधी ‘हे’ वाचा, नाहीतर ठोठावला जाऊ शकतो २० हजारांचा दंड

217

महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आणि राजधानी मुंबईला जोडणार हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा डिसेंबरपासून सर्वांसाठी खुला झाला. महाराष्ट्रातील १० महत्त्वांच्या जिल्ह्यांमधून जाण्याबरोरच ३९२ गावे आणि २४ तालुक्यांतून जाणारा हा महामार्ग आहे. ११ डिसेंबर २०२२ या महामार्गाचा पहिला टप्पा सुरू झाला. दरम्यान आता महामार्गावरून जाणाऱ्यांसाठी नागपूर ग्रामीण आरटीओने विशेष खबरदारी घेतली आहे. सतत होणारे अपघात टाळण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

जेव्हा महामार्ग सुरू झाला तेव्हा अपघातांच्या घटना वाढायला लागल्या, त्यासाठीच नागपूर ग्रामीण आरटीओने टायर्सवर आपले लक्ष केद्रिंत केले. वाहनाचे टायर्स जर योग्य स्थितीत नसेल तर समृद्धी महामार्गावरून तुम्हाला जाता येणार नाही. विशेष म्हणजे अशा वाहनांना प्रवेश रोखण्यासोबतच मोटर वाहन कायद्यानुसार २० हजार रुपयांपर्यंत दंडही आकारला जाईल.

दरम्यान यापूर्वी आरटीओने महाामार्गावरील वाहनांची कसून चौकशी करून दोषी वाहनांवर कारवाई केली. तसेच समृद्धी महामार्गावरील अपघाताची कारणे व उपाययोजनांसाठी परिवहन रस्ता सुरक्षा उपायुक्त भरत कळसकर यांनी पाहणी केली. व आधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

टायर्स खराब होण्याचे प्रमाण

सुरक्षित प्रवासासाठी टायर्स योग्य स्थितीत असायला हवेत. कारण गेल्या काही महिन्यात टायर फुटण्याचे प्रमाण वाढलेले आहेत. तसेच गेल्या चार महिन्यात समृद्धी महामार्गावर ३६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन आधिकारी विजय चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार, एमएच ११ बीएल ४१०७ एमएच २७ ए ९९२७ व एचआर ३ एडी ४८३९ या क्रमांकाच्या वाहनांवर दोषी आढळल्यामुळे २० हजारांचा दंड आकारून कारवाई करण्यात आली. तसेच टायर्सना एक आयुष्य असते. समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी वायुवेग पथकाकडून तपासणी केली जात आहे. टायर चांगल्या स्थितीत नसलेल्यावर योग्य ती दंडात्मक कारवाई केली जाईल असेही चव्हाण म्हणाले.

(हेही वाचा – नाशिकमध्ये एसटीचा भीषण अपघात; 2 जणांचा मृत्यू; अनेक जण जखमी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.