Nagpur Airport Bomb Thret: नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी; ‘AAI’ला आला मेल, प्रवाशांच्या सुरक्षेत वाढ

104
Nagpur Airport Bomb Thret: नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी; ‘AAI’ला आला मेल, प्रवाशांच्या सुरक्षेत वाढ

राज्यासह देशभरात मागील काही दिवसांपासून अज्ञातांकडून आंतरराष्ट्रीय विमानतळ, शाळा किंवा शासकीय रुग्णालय उडवून देण्याची धमकी मेल मार्फत देण्याच्या घटना वाढत आहेत. अशीच एक घटना डॉ. बाबासाहेब आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळ (Dr. Babasaheb International Nagpur Airport) बॉम्बने उडविणार असल्याच्या धमकीचा ई-मेल (Threatening e-mail) मंगळवारी दुपारी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया (Airport Authority of India) अर्थात ‘एएआय’ला प्राप्त झाला. या धमकीने चांगलीच खळबळ माजली आहे. परिणामी ई-मेल प्राप्त झाल्यानंतर विमानतळावरील सुरक्षा वाढविण्यात आली असून प्रवाशांची कसून तपासणी करण्यात येत आहे. अशा प्रकारचा ई-मेल प्राप्त होण्याची गेल्या दोन महिन्यातील ही दुसरी घटना आहे. मुख्य म्हणजे हा मेल नागपूरसह देशभरातील इतर विमानतळ प्रशासनांदेखील प्राप्त झाल्याची माहिती आहे. (Nagpur Airport Bomb Thret)

दिल्ली, पाटणा यांसह देशभरातील चाळीसहून अधिक विमानतळांवर बॉम्ब असल्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवारी दुपारी १२.३० ते १ वाजतादरम्यान प्राप्त झाला. विमानतळांवर बॉम्बस्फोट घडविण्याचा ई-मेल धडकल्याने विमानतळ प्रशासनाला धडकी भरली आहे. यासंदर्भात वरिष्ठ विमानतळ संचालक आबिद रुही यांनी दिलेल्या माहितीनुसार,‘मंगळवारी दुपारी १ वाजतादरम्यान एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाला विमानतळ उडविण्याचा मेल प्राप्त झाला. त्यांनी विमानतळ प्रशासन म्हणून मिहान इंडिया लिमिटेडला तो मेल फॉरवर्ड केला. (Nagpur Airport Bomb Thret)

(हेही वाचा – Narendra Modi: ६० वर्षांत पहिल्यांदाच एखाद्या सरकारने हॅटट्रिक केली, काशीत मोदी म्हणाले…)

अशा स्वरूपाची माहिती मिळाल्यानंतर निर्धारित असलेल्या प्रमाणित प्रक्रियेनुरूप विमानतळावर बॉम्ब डिटेक्शन अॅण्ड डिस्पोजल स्क्वाड (BDDS) आणि श्वान पथक तैनात करण्यात आले. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या (CISF) चमूद्वारे दक्षता बाळगण्यात येत आहे. पूर्वीच्या तुलनेत सुरक्षा तपासणीत वाढ करण्यात आली आहे. पार्किंग परिसरात वाहनांची तपासणी केली जात आहे. (Nagpur Airport Bomb Thret)

हेही पाहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.