
नागपूर (Nagpur Blast) जिल्ह्यातील कळमेश्वर पोलिस स्टेशन (Kalmeshwar Police Station) हद्दीतील कोतवालबड्डी परिसरातील एका एक्सप्लोसिव्ह कंपनीमध्ये (Explosives Manufacturer Company) मोठा स्फोट (Massive Blast) झाल्याची माहिती मिळत आहे. (Nagpur Blast)
एका खाजगी कंपनीत हा स्फोट झाला असून या ठिकाणी स्फोटक संबंधीत साहित्य तयार केलं जात असल्याची प्रथमिक माहिती पुढे आली आहे. मात्र, नेमका हा स्फोट कशामुळे झाला? हे अद्याप कळू शकलेले नाही. परंतू हा स्फोट इतका भीषण होता की यात दोन कामगार मृत्युमुखी पडल्याची प्रथमिक माहिती मिळत आली आहे. (Nagpur Blast)
हेही वाचा-Pune Metro : स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गात बदल ; काय आहे कारण ?
रविवार (16 फेब्रुवारी) दुपारी दोन वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. हा स्फोट इतका भीषण होता की यात कंपनीमधील छप्पर मजूरांवर पडून आणि आगीत होरपळून दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. (Nagpur Blast)
हेही वाचा-कोल्हापुरात GBS चा दुसरा बळी; राज्यातील रुग्णांचा आकडा १२ वर
मृतकांचा आणि जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. सध्या पुढील कारवाई पोलिसांकडून करण्यात येत आहे. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Nagpur Blast)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community