नागपुरात लवकरच पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक आणि सीएनजी बस दाखल होणार आहेत. नागपुरातील बस विभागात सध्या 70 बसेस सीएनजीमध्ये परावर्तीत करण्यात आल्या आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केलेल्या पर्यावरण पूरक वाहतूक धोरणांतर्गत या नवीन इलेक्ट्रीक आणि सीएनजी बस सुरु करण्यात आल्या आहेत.
प्रदूषणाला बसणार आळा
इलेक्ट्रिक बस सुरू झाल्यानं इंधनावरील खर्चात बचत होणार आहे. शिवाय प्रदूषण कमी होईल. सीएनजीचा वापर केल्यामुळं खर्चात बचत होणार आहे. त्यामुळे शहराचं प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. याच दृष्टिकोणातून हा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या स्वप्नातून हे साकार होत आहे.
( हेही वाचा:कर्नाटकाप्रमाणे देशभरातील मंदिरे सरकारी नियंत्रणापासून मुक्त करण्याची मागणी )
40 मिडी बस होणार दाखल
केंद्र शासनाच्या फेम दोन योजनेअंतर्गत नागपूर शहराकरिता अनुदानासह मंजूर 100 बसेसपैकी प्रथम टप्प्यात 40 मिडी ई-बसेस दाखल होत आहेत. उर्वरित 60 मिडी ई-बसेस अनुदानासह खरेदी करण्याचा मानस आहे. ई-बसेस खरेदीबाबत आराखडा तयार करण्याचेही सूचित करण्यात आले आहे. त्यानुसार 12 मीटर लांब एसी स्टॅण्डर्ड ई-बस पाच आणि नऊ मीटर लांब एसी मिडी ई-बस 50 नग खरेदी करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.