राज्यासह देशभरात मागील काही दिवसांपासून ‘हिट अँड रन’च्या (Hit and run) घटनेचे प्रमाण वाढत चालले आहे. या पूर्वी पुणे, कल्याण, मुंबई येथे घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण देश हदरला होता. दरम्यान अशीच एक घटना नागपूर येथे घडली आहे. या घटनेत दुचाकीवरुन तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. (Nagpur Hit And Run Case)
नागपूरच्या केळवद पोलीस ठाण्याच्या (Nagpur Kelwad Police Station) हद्दीत (३० सप्टेंबर) नागपूर छिंदवाडा महामार्गावर हिट अँड रनची (Hit and run on Chhindwara highway) भीषण घटना घडली. या अपघातात दुचाकीवरुन तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघाताची (Accident) घटना घडताच स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, पोलिसांना पाचारण करण्यात आले.
(हेही वाचा – BCCI Center of Excellence : बीसीसीआयच्या नवीन क्रिकेट अकादमी सरावासाठी तीन प्रकारच्या खेळपट्ट्या )
चारचाकी आणि दुचाकी वाहनाचा हा अपघातात झाला असून दुचाकीवर स्वार असलेल्या तिघांचा जागची मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर अज्ञात वाहनाने घटनास्थळावरुन पळ काढला. नागपूर-छिंदवाडा महामार्गावर (Hit and run on Chhindwara highway) दुपारी १२ वाजताच्या सुमारासची घटना या अपघातानंतर स्थानिकांकडून माहिती मिळताच केळवद पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा पंचनामा करत आहेत. (Nagpur Hit And Run Case)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community