Nagpur-Madgaon Express ला २९ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

88
Nagpur-Madgaon Express ला २९ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

कोकण रेल्वे मार्गावर मडगाव ते खान्देश मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर चालवण्यात येणारी गाडी क्र ०११३९/४० नागपूर मडगाव प्रतीक्षा द्विसाप्ताहिक एक्स्प्रेसला २९ सप्टेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. खान्देश, विदर्भातून थेट कोकणात येण्यासाठी रेल्वेगाडी उपलब्ध नसल्याने अशा रेल्वेची मागणी वारंवार रेल्वे प्रवासी संघटनांकडून केली जात होती. ती मान्य करण्यात आली आणि हंगामी स्वरूपात गाडी सुरू करण्यात आली. तिला वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली. आता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आठवड्यातून दोनदा धावणारी ही गाडी २९ सप्टेंबर २०२४ पर्यंत चालवली जाणार आहे. (Nagpur-Madgaon Express)

सुधारित वेळापत्रकानुसार ही गाडी नागपूर येथून दर बुधवार आणि शनिवारी दुपारी ३ वाजून ६ वाजता सुटेल आणि गुरुवार आणि रविवारी मडगाव येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी पावणेसहा वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी (क्र. ०११४०) गुरुवार आणि रविवारी मडगाव येथून रात्री ८ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री साडेनऊ वाजता नागपूला पोहोचेल. ही गाडी वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, नाशिक, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ, थिवी आणि करमाळी या स्थानकांवर थांबणार आहे. तीन महिन्यांत या विशेष रेल्वेच्या दोन्ही बाजूच्या मिळून ५४ फेऱ्या होणार आहेत. या गाडीचे संगणकीय आरक्षण आयआरसीटीसी आणि आरक्षण खिडकीवर सुरू होईल. (Nagpur-Madgaon Express)

(हेही वाचा – Maharashtra Budget Session : महसुली तूट २० हजार कोटींपेक्षा अधिक; सरकारच्या जमा खर्चाचा मेळ बसेना!)

या गाडीचा अधिकाधिक प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कल्याण सावंतवाडी रेल्वे प्रवासी समितीचे संस्थापक अध्यक्ष सुनील उत्तेकर, पुणे कल्याण मार्गे सावंतवाडी रेल्वे प्रवासी समितीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत परब, राष्ट्रीय रेल्वे सल्लागार समिती (शेगाव) सल्लागार ॲड. पुरुषोत्तम डांगरा, संजय त्रिवेदी, राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस वैभव बहुतुले आणि विविध प्रवासी संघटनांच्या प्रमुखांनी केले आहे. (Nagpur-Madgaon Express)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.