नागपूर ते मडगाव विशेष गाडीला ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

165

विदर्भ आणि कोकणाला जोडणाऱ्या आणि आठवड्यातून दोनदा धावणाऱ्या नागपूर मडगाव साप्ताहिक रेल्वेगाडीला ८ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी ही गाडी २८ फेब्रुवारीपर्यंतच धावणार होती. गर्दीचा हंगाम लक्षात घेत रेल्वे प्रशासनाने मुदतवाढीचा निर्णय घेतला आहे. विदर्भातून थेट कोकण मार्गावर येण्यासाठी ०११३९/०११४० क्रमांकाच्या नागपूर-मडगाव साप्ताहिक विशेष गाडीला पुन्हा मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली होती.

( हेही वाचा : ‘बीएमसी एसबीआय अर्ध मॅरेथॉनसाठी प्रोमो-रन’, मुंबईकर धावणार २६ फेब्रुवारीला )

यानुसार आता १ मार्च ते ७ जून या कालावधीत दर बुधवार व परतीच्या प्रवासात २ मार्च ते ८ जूनपर्यंत दर गुरुवार आणि रविवारी ही गाडी धावेल. एकूण २२ डब्यांच्या या गाडीला वर्धा, पुलगाव, धामणगाव, वडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, नाशिक, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ, थिवी आणि करमळी या स्थानकांवर थांबे आहेत.

तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा. तसेच प्रवाशांनी स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविड योग्य वर्तन पाळण्याचा सल्ला रेल्वेने दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.