Nagpur Rain : नागपूर मध्ये पावसाचा हाहाकार, तात्काळ मदत करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

महापालिकेची यंत्रणा घटनास्थळी पोचहचली असून लोकांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाले.

183
Nagpur Rain : नागपूर मध्ये पावसाचा हाहाकार, तात्काळ मदत करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
Nagpur Rain : नागपूर मध्ये पावसाचा हाहाकार, तात्काळ मदत करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

नागपुरात काल मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह प्रचंड पाऊस (Nagpur Rain )पडला आहे. त्यामुळे नागपुरातील सखल भागात प्रचंड पाणी साचलं आहे. अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने तलावाचं पाणी शहरात शिरलं आहे. त्यामुळे शहरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाले आहे.शिवाय पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू झाला. सर्वत्र पाणीच पाणी झाल्यामुळे परिसरातील लोकांच्या घरात पाणी शिरले आहे .

महापालिकेची यंत्रणा घटनास्थळी पोचहचली असून लोकांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाले. कार्पोरेशन कॉलनी ,कस्तुरबा नगर, डागा ले आऊट, सुभाष नगर येथील पाचशे लोकांना आतापर्यंत बाहेर काढण्यात आले आहे. तीन बोटी घटनास्थळी आले बोटीच्या सहाय्याने लोकांना घराच्या बाहेर काढले जात आहे. शंकर नगरमध्ये लोकांच्या घरात पाणी शिरले.मोरभवन परिसरात पाणी शिरले आहे. बसेस अर्ध्या पाण्यांत असून तिथून लोकांना बाहेर काढणे सुरू आहे.

एसटी स्टँडमध्येही पाच ते सात फूट पाणी शिरलं आहे. पुलाखालीही प्रचंड पाणी भरल्याने कार पाण्यात बुडाल्या आहेत. अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली आहे. आजची सकाळ नागपूरकरांसाठी अत्यंत त्रस्त करणारी ठरली आहे. दुसरीकडे एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीमने युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केलं आहे.
कस्तुरबा नगर आणि डाग आले तेथील अनेक लोक दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील इमारती असलेल्या घरात पोहचले असून काही लोक टेरेसवर उभे आहेत. तलावातील पाणी अजूनही बाहेर येणे सुरू असल्यामुळे डागा ले आउट आणि अंबाझरी येथील लोकांच्या घरातील पार्किंग भरून पहिल्या मजल्यापर्यंत पाणी शिरले आहे. चंद्रनगर जुनापारडी नाका पूर्व नागपूर येथेही पावसाचं पाणी शिरलं आहे. मोरभवन लगतच्या पुलाखाली पाणी भरल्याने कार पाण्यात बुडाल्या आहेत. तसेच वाहतुकीची कोंडीही झाली आहे. शंकर नगर येथील मुकबधीर विद्यालयाच्या परिसरात पाणी शिरल्यामुळे तिथे शंभरपेक्षा अधिक मुले अडकली असून महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे कर्मचारी त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

(हेही वाचा : Campaign Godavari Brahmagiri Plastic Free : गोदावरी, ब्रह्मगिरी नदीपात्र प्रदूषणमुक्त करण्यासाठी २ ऑक्टोबरपासून विशेष अभियान)

काय म्हणाले उपमुख्यमंत्री फडणवीस ट्विट मध्ये
नागपुरात काल रात्री मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने काही भागात पाणी शिरले आहे. अवघ्या ४ तासात १०० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी मला दिली.
नागपूर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त हे घटनास्थळी पोहोचले असून तातडीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. सखल भागात अडकलेल्या नागरिकांना आधी तातडीने मदत करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. एनडीआरएफची एक आणि एसडीआरएफच्या २ चमू बचाव कार्यात तैनात करण्यात आल्या आहेत. सातत्याने प्रशासनाशी संपर्कात असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.