अतिवृष्टीमुळे नागपूर विद्यापीठाने परीक्षा रद्द केल्या होत्या. आता या रद्द केलेल्या परीक्षांच्या नव्या तारखा विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. 16 ऑगस्टची रद्द झालेली परीक्षा आता 27 ऑगस्टला होणार आहे. तसेच, 17 ऑगस्टची परीक्षा 28 ऑगस्टला घेतली जाणार आहे. परीक्षांची वेळ ही आधी दिलेल्या वेळापत्रकानुसारच असणार आहे. तसेच, 21 ऑगस्टची स्थगित केलेली परीक्षा आता 1 सप्टेंबरला होईल.
नागपूर जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा कहर
नागपूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण कमी आहेत. परंतु स्वाईन फ्लूने चिंता वाढवली आहे. जिल्ह्यात स्वाईन फ्लूने आणखी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर स्वाईन फ्लूच्या मृतांची संख्या नागपूर जिल्ह्यात 10 वर पोहोचली आहे. जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे आतापर्यंत 211 रुग्ण आढळले आहेत.
( हेही वाचा: दहीहंडीला खेळाचा दर्जा! पुढील वर्षापासून ‘प्रो गोविंदा’ स्पर्धा; मुख्यमंत्र्यांची घोषणा )
कृषीमंत्री अब्दूल सत्तार नागपूर दौ-यावर
कृषीमंत्री अब्दुल सत्तार शुक्रवारी नागपूर जिल्ह्याच्या दौ-यावर आहेत. सकाळी 10 वाजता अब्दुल सत्तार कृषी विभागाचा आढावा घेणार आहेत. अब्दुल सत्तार अतिवृष्टीबाधित क्षेत्राची पाहणी करणार. कृषीमंत्री झाल्यानंतर अब्दुल सत्तार यांचा पहिलाचा विदर्भ दौरा आहे.
Join Our WhatsApp Community