Nagpur University: नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंवर मोठी कारवाई; राज्यपालांकडून दुसऱ्यांदा निलंबन

145
Nagpur University: नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंवर मोठी कारवाई; राज्यपालांकडून दुसऱ्यांदा निलंबन
Nagpur University: नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंवर मोठी कारवाई; राज्यपालांकडून दुसऱ्यांदा निलंबन

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे (Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University) कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी (Vice Chancellor Dr. Subhash Chaudhary suspended) यांना गुरुवारी (०४ जुलै) रोजी राज्यपालांनी निलंबित केले. कुलगुरूंचे हे दुसरे निलंबन असून यापूर्वी २१ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यांना निलंबित करण्यात आले होते. परंतु, कुलगुरूंनी त्यावेळी हायकोर्टातून निलंबनावर स्थगिती आणली होती. (Nagpur University)

डॉ. चौधरी यांच्या विरोधात अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. या तक्रारींच्या चौकशीसाठी उच्च तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव अजित बाविस्कर (Deputy Secretary of Higher Technical Education Department Ajit Baviskar) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल राज्यपालांना सादर केला होता. या अहवालात कुलगुरूंकडून अधिकारांचा दुरुपयोग झाल्याचे, ‘एमकेसीएल’संदर्भात सरकारचे आदेश डावलल्याचे आरोप करण्यात आले होते. (Nagpur University)

(हेही वाचा – Team India Victory Parade : टीम इंडियाच्या स्वागतासाठी लाखो चाहते रस्त्यावर, पोलिसांवरील ताण वाढला

तसेच परीक्षेच्या कामात महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादितची (MKCL) निवड आणि विनानिविदा बांधकामांचे कंत्राट देण्यात आल्याचे निष्कर्ष या अहवालात नोंदवण्यात आले होते. ‘एमकेसीएल’ सोबत विद्यापीठाने केलेला करार २०१५ मध्ये रद्द करण्यात आला होता. सप्टेंबर २०१७ मध्ये राज्य शासनाने विद्यापीठाला पत्र पाठवून ‘एमकेसीएल’ ला कोणतेही काम थेट देऊ नये असे पत्र दिले होते. असे असतानाही विद्यापीठाने शासन निर्णय डावलत ‘एमकेसीएल’ला कंत्राट दिल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आला होता.

(हेही वाचा – Team India Meets PM Modi : भारतीय संघ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीत नेमकं काय झालं?)

याप्रकरणी राज्यपालांनी कुलगुरूंना २१ फेब्रुवारी २०२४ रोजी निलंबित केले. याविरोधात कुलगुरू चौधरी यांनी राज्यपालांच्या आदेशावर उच्च न्यायालयातून स्थगिती आणली. परंतु, चौकशीला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टाने नकार दिला होता. त्यामुळे राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांनी गुरुवारी डॉ. चौधरी यांना त्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी बोलावले होते. यावेळी डॉ. चौधरींनी आपले लेखी उत्तर सादर करत 2 दिवसांची वैद्यकीय रजा मागितली होती. त्यानंतर राज्यपालांनी कारवाईचा बडगा उगारत त्यांना दुसऱ्यांदा निलंबित केले. सलग दोन वेळा निलंबित होणारे नागपूर विद्यापीठाच्या इतिहासातील चौधरी हे पहिले कुलगुरू ठरले आहेत. (Nagpur University)

हेही पाहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.