Nagpur Violence: पोलिसांवर हात उचलणाऱ्यांना पोलिसी खाक्या दाखवणार; गृहराज्यमंत्री Yogesh Kadam यांचा इशारा

46
‘ज्यांनी पोलिसांवर हात उचलला, त्यांना १०० टक्के पोलिसी खाक्या दाखवणार’; गृहराज्यमंत्री Yogesh Kadam यांचा आंदोलनकर्त्यांना कडक इशारा
‘ज्यांनी पोलिसांवर हात उचलला, त्यांना १०० टक्के पोलिसी खाक्या दाखवणार’; गृहराज्यमंत्री Yogesh Kadam यांचा आंदोलनकर्त्यांना कडक इशारा

Yogesh Kadam : “नागपुरात ज्यांनी पोलिसांवर हात उचलला, त्यांना पोलिसांचा धाक काय असतो, हे 100 टक्के दाखवणार. कायदा हातात घेऊन अशी कृत्य करणाऱ्यांना सोडणार नाही. पोलिसांच मनोबल कमी होता कामा नये. ही आमची जबाबदारी आहे. पोलिसांवर हात उचलणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत” असं गृहराज्यमंत्री योगेश कदम (Minister of State for Home Affairs Yogesh Kadam) म्हणाले. नागपूरात जे काही घडलं, त्यावर सरकारची भूमिका काय? पोलिसांच मनोबल कसं वाढवणार? या प्रश्नावर योगेश कदम यांनी हे उत्तर दिलं. (Yogesh Kadam)

(हेही वाचा – Ola Share Price : ओला कंपनीच्या शेअरमध्ये या आठवड्यात घसरण का झाली? अनियमिततेचं प्रकरण नेमकं काय आहे?)

औरंगजेबाच्या कबरीच्या (Aurangzeb’s Tomb) मुद्यावरून सध्या महाराष्ट्राचे वातावरण तापले आहे. हिंदुत्ववादी संघटनेने या प्रकरणी औरंगजेबाच्या प्रतिकात्मक कबरीचे दहन केल्यानंतर सोमवारी रात्री नागपूरमध्ये (Nagpur Violence) मोठी दंगल उसळली. त्यात तब्बल 33 पोलिस जखमी झालेत. यात 4 उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर योगेश कदम यांनी दंगेखोरांना उपरोक्त इशारा दिला आहे.

व्हिडिओ व्हायरल झालेत
औरंगजेबाच्या कबरीवरुन राज्यातील वातावरण तापलं आहे. सोमवारी याच मुद्यावरुन नागपुरात दोन गटात हिंसक संघर्ष झाला. वाहनं फोडण्यात आली. वाहनांना आगी लावण्यात आल्या. नागपूरच्या महाल भागात रस्त्यावर कशा प्रकारे हिंसाचार सुरु होता, त्याचे व्हिडिओ व्हायरल झालेत. मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली. पोलीस, अग्निशमन दलाचे जवान या हिंसाचारात जखमी झाले. त्यांच्यावर हल्ले करण्यात आले. औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्यावरुन राज्यातील वातावरण तापलं आहे.

(हेही वाचा – Ola Share Price : ओला कंपनीच्या शेअरमध्ये या आठवड्यात घसरण का झाली? अनियमिततेचं प्रकरण नेमकं काय आहे?)

महिला पोलिसाचा विनयभंग
नागपूरमध्ये हा राडा सुरु असताना अजून एक धक्कादायक घटना घडली. नागपूरमध्ये जमावाकडून महिला पोलिसाचा विनयभंग (Nagpur Female police molestation) करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी जमावाविरोधात गणेशपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.