Nagpur Violence: ११ ठिकाणी संचारबंदी कायम; १५० हून अधिक शाळा बंद

43
Nagpur Violence: ११ ठिकाणी संचारबंदी कायम; १५० हून अधिक शाळा बंद
Nagpur Violence: ११ ठिकाणी संचारबंदी कायम; १५० हून अधिक शाळा बंद

Nagpur Violence: छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेल्या (Chhatrapati Sambhaji Nagar) औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून सोमवार, १७ मार्चला करण्यात आलेल्या आंदोलनाला नागपूरमध्ये हिंसक वळण लागलं आहे. परिणामी, कधी नव्हे ते उपराजधानीत ऐवढया मोठ्या प्रमाणात हिंसाचार (Nagpur violence) उफाळल्याची घटना घडली. दरम्यान, सध्या नागपूरमध्ये तणावाचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त करत परिस्थितीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले आहे. तर परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर हळूहळू नागपूर शहरातील विविध भागांना ढील देण्याचा निर्णय घेतला जाणार, अशी माहिती नागपूर पोलिसांच्या (Nagpur Police) वरिष्ठ सुत्रांनी दिली. (Nagpur Violence)

(हेही वाचा – Mudra Loans: राज्यातील साडेदहा लाख कर्जदारांनी थकवले मुद्रा कर्ज; बँकर्स अहवालातून माहिती उघड)

दुसरीकडे, सध्या तरी नागपूरच्या ११ पोलीस ठाणे हद्दीत संचारबंदी (Nagpur curfew) उठवण्यासाठी नागपूर पोलिसांचा कोणताही विचार नसल्याची माहिती पुढे आली आहे. शहरातील काही भागात जी संचारबंदी लागू करण्यात आली आहे ती अनिश्चित कालासाठी लागू असणार आहे. तर परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर टप्प्याटप्प्यात संचारबंदीमध्ये ढील देण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती नागपूर पोलिसांच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.

१५० हून शाळा अधिक बंद
नागपूर शहरातील पोलिसांच्या तीन झोन अंतर्गत ११ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्फ्यू कायम आहे. संवेदनशील भागात कडेकोट पोलीस बंदोबस्त करण्यात आला असून, क्यूआरटीएसआरपीएफच्या तुकड्या बंदोबस्तावर आहेत. नागपूर शहरातील संचारबंदी असलेल्या भागातील १५० हून अधिक शाळा आजही बंद असणार आहे. याची माहिती विद्यार्थ्यांना उशीरा मिळाल्यामुळे त्यांना आल्या पावली घराच्या दिशेनं पुन्हा जावं लागलं आहे.

(हेही वाचा – ठाणे-मुलुंड रेल्वे स्थानकाच्या कामाला गती द्या; MP Naresh Mhaske यांची लोकसभेत मागणी )

४६ आरोपींना अटक
नागपुरातील जाळपोळ आणि दगडफेक प्रकरणी आतापर्यंत ४६ आरोपींना ताब्यात घेतलं आहे. त्यापैकी ३६ आरोपींना पोलिसांनी १८ मार्चला जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं. सहा आरोपी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत. रात्री अडीच वाजता याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. कोर्टाने आरोपींना २१ मार्चपर्यंत पीसीआर दिला आहे. या आरोपींविरोधात गणेश पेठ आणि तहसील पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच आणखी आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

संचारबंदीमुळे २५० कोटींचं नुकसान
नागपुरातील संचारबंदीमुळे पहिल्याच दिवशी सुमारे २५० कोटींचा व्यापार प्रभावित झाला आहे. परिस्थिती लवकरात लवकर सुधारावी आणि सणासुदीच्या तोंडावर व्यापार पुन्हा एकदा सुरळीत सुरू व्हावा, अशी मागणी व्यापारी वर्गाकडून करण्यात आली आहे. संचार बंदीमुळे ही परिस्थिती सुधारित जरी झाली तरी पूर्व होत होण्यासाठी किमान आठ दिवसाचा कालावधी लागेल. त्यामुळे लवकरात लवकर ही संचारबंदी बंद होऊन व्यापार सुरळीत व्हावा अशी मागणी व्यापारी वर्गाकडून केली जात आहे.

उपराजधानीचे जनजीवन सामान्य पद्धतीने सुरु
दरम्यान,19 मार्चला नागपूरची दैनंदिन सुरवात नियमितप्रमाणे झाली आहे. दंगल सदृश प्रभावित क्षेत्र वगळता बुधवारी नागपूरमध्ये जनजीवन सामान्य पद्धतीने सुरु आहे. नागपूर मेट्रो, शहर परिवहन सेवा, राज्य परिवहन सेवा देखील नियमित पद्धतीने सुरु आहेत. मात्र 11 पोलीस ठाणे हद्दीतील प्रभावित क्षेत्रात फक्त संचार बंदी लागू असणार आहे. दुसरीकडे नागपुरात काही भागात सध्या तणावपूर्वक शांतता आहे. मात्र खबरदारी म्हणून पोलिसांनी संचारबंदी क्षेत्रात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला आहे.

 (हेही वाचा – IPL 2025 : आयपीएलमध्ये लिलावानंतरही खेळाडू बदलता येतात का? नियम काय सांगतो?)

समाजकंटकावर पाच गुन्हे दाखल
नागपुरात झालेल्या २ गटातील राड्यानंतर पोलिसांनी समाजकंटकावर पाच गुन्हे दाखल केले आहेत. गुन्हेगारांना पकडण्यासाठी गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांची दहा पथके तयार करण्यात आली आहेत. सीसीटीव्ही तपासून आणि नागरिकांची चौकशी करून आरोपींची ओळख पटवली जात आहेत.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.