फलकबाजी करताय तर सावधान; ‘हा’ मजकूर नसेल तर होणार कारवाई

148

नाशिक महानगर पालिकेच्या हद्दीत फलकबाजी करताना आता काही नियमांचे पालन करावे लागणार आहे. शहरातील विद्रूपीकरण थांबवण्यासाठी आणि कर बुडवणा-यांना चाप लावण्यासाठी पालिकेने आता आणखी एक अट घातली आहे. कुठलाही फलक लावायचा असेल तर त्यासाठी आता क्यूआर कोड लावणे बंधनकारक केले आहे. परवाना क्रमांकासहित क्यू आर कोड आता फलकांवर लावावा लागणार आहे. अन्यथा थेट पालिकेच्यावतीने संबंधित फलक लावणा-यांवर गुन्हा दाखल केला जाणार आहे. नाशिक महानगरपालिका हद्दीत हा नियम 14 डिसेंबरपासून लागू होणार आहे.

नाशिक शहर पोलीस दलाचे तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी फलक लावताना विशेष नियमावली केली होती, त्यासाठी पोलिसांची परवानगीही आवश्यक होती. फलकावरील मजकूर तपासूनच परवानगी दिली जात होती. मात्र, दीपक पांडे यांची बदल झाल्यानंतर फलकांबाबतची अंमलबजावणी थंड झाली होती. त्यातच आता पुन्हा पालिका आयुक्तांनी याबाबत कठोर निर्णय घेतला आहे. क्यूआर कोड आढळून न आल्यास थेट भरपाईची कारवाई आणि फौजदारी कारवाई होणार आहे.

( हेही वाचा: कोल्हापूरमध्ये 15 दिवसांसाठी जमावबंदी; ‘हे’ आहे कारण )

पालिकेला करावा लागणार अर्ज

नाशिक महानगरपालिकेच्या वेबसाइटवर याबाबत जाहिरात यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्याच ठिकाणी फलक लावता येणार आहे. अन्यत्र फलक लावायचा असेल तर पालिकेला अर्ज करुन परवानगी घ्यावी लागणार आहे. संबंधित फलकावर अर्जदाराचे नाव, परवानगी क्रमांक, परवानगी दिलेले ठिकाण आणि क्यूआर कोड बंधनकारक असणार आहे. त्यामुळे फलकबाजी करताना कर बुडवणा-यांना चांगलाच चाप बसणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.