झाडांवरच्या खिळ्यांची तुटली नाळ, मुंबईभर खिळेमुक्त झाडांना संमिश्र प्रतिसाद

178

सोमवारपासून मुंबईतील झाडांना खिळेमुक्त करण्याच्या अभियानाला मुंबई महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाच्यावतीने सुरुवात करण्यात आली. या अभियानात पालिकेच्या उद्यान विभाागातील कर्मचारी तसेच इतर संबंधित विभागातील कर्मचारी आता प्रत्येक वॉर्डात झाडांवरील फलक, केबलच्या वायरी, खिळे काढत आहेत. मात्र पहिल्याच दिवशी ठिकठिकाणी या अभियानाला संमिश्र प्रतिसाद मिळाला.

खिळे काढण्याचे अभियान सुरु

रविवारी रिव्हर मार्च या नदीप्रेमी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या अभियानाला बोरिवली पूर्वेतून सुरुवात केली. कुलुपवाडी परिसरातील चार झाडांवरील खिळे काढले. दोन तासाच्या प्रयत्नानंतर चार झाडांमधून पाऊण किलो खिळे निघाल्याची माहिती रिव्हर मार्चचे प्रमुख सदस्य गोपाल झावेरी यांनी दिली. दुस-या दिवशी एम.जी. मार्गावरील खिळे काढण्यासाठी आलेल्या पालिका अधिका-यांना मात्र दुकारनदारांच्या रोषाचा सामना करावा लागला. त्यामुळे मोहिम राबवायला वेळ खूप खर्च झाला, असेही झावेरी म्हणाले.

( हेही वाचा: Amway India: अॅम्वे इंडियावर ईडीची धाड, श्रीमंतीचे स्वप्न दाखवून…)

नागरिकही करताहेत सहकार्य

मुंबईच्या जी-दक्षिण या पालिका वॉर्डातील परिसरात कर्मचा-यांच्या उपस्थितीमुळे झाडांवरील केबल पाडल्याचे पाहताच केबलची सुविधा देणारी माणसेच अखेर या कामी धावून आली. पालिका अधिका-यांनी झाडांवरील केबल, हॉर्डिंग्स जप्त केल्याचे पाहताच केबलधारकांनी स्वतःहून अवैधरित्या झाडांवर लावलेले केबल्स काढलेत. उपहारगृहाच्या जवळ असलेल्या झाडांवरील दिवे मालक स्वतःहून काढून सहकार्य करत असल्याची माहिती जी साऊथ विभागाचे सहआयुक्त अविनाश यादव यांनी दिली. सेनापती बापट मार्ग, एन.एम.जोशी मार्ग, पांडुरंग बुधकर मार्ग, गोखले मार्ग या भागांतील झाडांना खिळेमुक्त करुन तब्बल १५ किलो खिळे व तारा पालिका अधिका-यांनी जप्त केल्या. २१ एप्रिलपर्यंत मुंबईभरात सुरु असलेल्या या मोहिमेत शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थीही सहभागी होत पालिका अधिका-यांना सहकार्य करत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.