मुत्रपिंडामुळे किडनी निकामी झाल्यास डायलिसीस करावे लागते. अशाप्रकारे किडनीच्या आजारांमुळे अनेक रुग्णांना डायलिसीस करणे आवश्यक असते. परंतु अनेक रुग्ण पैशांअभावी डायलिसीस वेळेवर करत नाही. परिणामी हा आजार अधिक बळवला जातो. त्यामुळे गरीब रुग्णांना या डायलिसीसची सेवा मोफतमध्ये महापालिका रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असून येत्या काही दिवसांमध्ये ही सेवा महापालिकेच्या नायर रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी महापालिका मुख्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना दिली. (Dialysis Facility)
मुंबईमध्ये डायलिसीससाठी पैसे नाही म्हणून रुग्ण दगावला जाऊ नये यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्या माध्यमातून महापालिकेची वैद्यकीय महाविद्यालय असलेल्या सर्व रुग्णालयांमध्ये मोफत डायलिसीसची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे केसरकर यांनी स्पष्ट केले. कोणत्याही आजाराचा रुग्ण बरा व्हायला हवा ही आमची भावना आहे. जे जे रुग्णालयात चांगल्याप्रकारे वॉर्ड बनवला, जो खासगी रुग्णालयासारखा वाटत आहे. त्यादृष्टीकोनातून कामा रुग्णालयात आयव्हीएफ सेंटर उभारण्यात आले आहे, तर रात्रीच्या वेळी निवारा, मुंबई सेंटरमध्ये हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. मुंबईतील पोलिसांच्या वसाहतींचा दुरुस्तीसाठी तरतूद करून दिली. छोट्या छोट्या गोष्टींकडे सरकार आता लक्ष देत असून यातून नागरिकांना समाधान मिळावे हीच भावना असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (Dialysis Facility)
(हेही वाचा – Senior Citizens Day Care Center : वृध्दांसाठी मुंबईत लवकरच डे केअर सेंटर)
मुंबई उंदिरमुक्त करण्याची घोषणा
मुंबई उंदिरमुक्त करण्याची घोषणा केसरकर यांनी केली असून शहरांमधील अनेक हाऊसगल्ल्यांमध्ये उंदरांचा वावर आहे. गिरगाव, परेल आदी भागांमध्ये मोठ्याप्रमाणात उंदरांची संख्या आहे. त्यामुळे उंदरांचे हे प्रमाण कमी करून उंदिरमुक्त करण्याचा प्रयत्न आहे. यामध्ये कचऱ्याचे प्रमाण कमी झाले की आपोआपच उंदरांचेही प्रमाण कमी होईल. त्यामुळे कचरा साठण्याचे प्रमाण कमी केले की उंदरांचे प्रमाणही कमी होईल, असे ते म्हणाले. त्यादृष्टीकोनातून हाऊसगल्ल्यांची स्वच्छता करण्याची मोहिम राबवली जात आहे. (Dialysis Facility)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community