Nala Safai : नालेसफाईच्या कामात दिरंगाई; कंत्राटदारांना आकारला सुमारे ५५ लाखांचा दंड

430
Nala Safai : नालेसफाईच्या कामात दिरंगाई; कंत्राटदारांना आकारला सुमारे ५५ लाखांचा दंड

मुंबई महापालिकेच्या वतीने पावसाळापूर्व नालेसफाईचे (Nala Safai) काम हाती घेण्यात आले असून आतापर्यंत सफाईचे काम ९० टक्क्यांहून अधिक झाले आहे. मात्र नालेसफाईच्या कामांसाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदाराकडून काही भागांमध्ये दिरंगाई झाली असल्याची बाब समोर आली आहे. मात्र या मोठ्या नाल्याच्या कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांना आतापर्यंत महापालिकेने सुमारे ५५ लाखांचा दंड आकारला आहे. (Nala Safai)

मुंबई महापालिकेच्यावतीने नालेसफाईच्या (Nala Safai) कामांसाठी कंत्राटदाराची निवड करून फेब्रुवारी त्यांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरांमधील छोट्या, मोठ्या नाल्यांसह द्रुतगती महामार्गालगतच्या नाल्यांच्या सफाईसाठी ३१ कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे. या नालेसफाईच्या कामांसाठी सुमारे २५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. (Nala Safai)

(हेही वाचा – Narendra Modi: पंतप्रधानांचा प्रचार रथ म्हणजे अभेद्य किल्ला, जाणून घ्या वैशिष्ट्ये…)

महापालिकेने या कामासाठी ३१ कंत्राटदारांची निवड केल्या नंतर काही नाल्यांची सफाई (Nala Safai) करण्यात विलंब झाला. तसेच काही ठिकाणी नाल्यातील गाळ काढल्यानंतर वेळीच उचलला गेला नाही, त्यामुळे या प्रकरणात विविध कंत्राटदारांना दंड आकारण्यात आला. यामध्ये शहर भागातील नालेसफाईच्या कामात सर्वाधिक ३१.६५ लाखांचा दंड आकारण्यात आला आहे. तर पूर्व उपनगरातील नालेसफाई कामात १२.६२ लाख आणि पश्चिम उपनगरातील नालेसफाई कामात १०.४८ लाखांचा दंड आकारला गेला आहे. त्यामुळे संपुर्ण मुंबईतील नालेसफाई कामात एकूण ५४.६८ लाखांचा दंड आकारण्यात आला आहे. (Nala Safai)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.