कोविडच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी नालेसफाईचे काम योग्यप्रकारे झाले नसल्याच्या तक्रारी येत असल्याने यावर्षी नालेसफाईचे काम मार्चपासूनच हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत सुरु झालेल्या नालेसफाईचे काम ३० टक्के पूर्ण झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. यंदाच्या नालेसफाईत मिठी नदीसह मोठ्या नाल्यांमध्ये प्रथमच अत्याधुनिक पध्दतीचे शिल्ट पुशर अँड ट्रक्सॉर या मशीनचा वापर करण्यात येत असून एम पूर्व विभागातील शिवाजीनगर, आदर्शनगर येथील नाल्यांमध्ये या मशीन आठ दिवसांपूर्वी उतरवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मशीनद्वारे गाळ पुढे ढकलून नालेसफाईच्या गाळाची पूर्णपणे सफाई करण्यावर भर दिला जात आहे.
नालेसफाई कामांसाठी १५२.२५ कोटी रुपयांच्या प्रस्तावांना मंजुरी
नाल्यांची साफसफाई करताना साधारणपणे पावसाळ्यापूर्वी ७५ टक्के, पावसाळ्यादरम्यान १५ टक्के व पावसाळ्यानंतर १० टक्के याप्रमाणे कामे केली जातात. पण ही कामे यंदा फेब्रुवारी-मार्चला सुरुवात झाली आहेत. या नालेसफाईच्या कामांच्या १५२.२५ कोटी रुपयांच्या प्रस्तावांना स्थायी समितीने मंजूर दिली आहे. त्यानुसार मोठ्या नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाली आहे. मागील वर्षी मुंबईत नदी-नाल्यांमधून एकूण ५ लाख ०४ हजार १२५ मेट्रिक टन गाळ उपसण्यात आला होता. यंदा त्यामध्ये सुमारे ३५ टक्के वाढ करुन ६ लाख ८५ हजार ३५८ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे. या उद्दिष्टापैकी आजमितीपर्यंत १ लाख ८३ हजार ७१६ मेट्रिक टन म्हणजे सुमारे ३५ टक्के गाळ काढण्यात आला असल्याचा दावा अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिला आहे.
(हेही वाचा : कोरोना रुग्णसंख्या ९ हजाराच्या आतच, मृत्यूचा आकडा पुढे सरकतोय!)
मोठ्या नाल्यांचे क्षेत्र आणि त्यावरील खर्च
- शहर भाग : अंदाजे ३२ कि. मी. लांब, (एकूण खर्च १२.१९ कोटी रुपये)
- पूर्व उपनगर भाग : सुमारे १०० कि. मी. लांब (एकूण खर्च २१.०३ कोटी)
- पश्चिम उपनगर : सुमारे १४० कि. मी. लांब,( एकूण खर्च २९.३७ कोटी रुपये)
- मिठी नदी : सुमारे २० कि. मी. लांब, (एकूण खर्च ८९.६६ कोटी