ताज महालमध्ये नमाज पठण, व्हिडिओ व्हायरल! चौकशी होणार

भारताच्या ऐतिहासिक वास्तू आणि जगातील आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताज महालच्या वास्तूत चक्क नमाज पठण करण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून, पुरातत्व विभागाच्या माध्यमातून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. पुरातत्व विभागाच्या अधिका-यांकडून याबाबत माहिती देण्यात येत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती बागेत नमाज पठण करत असताना दिसत आहे. तसेच त्याच्या शेजारी एक महिला देखील आहे. एका पर्यटकाने हा व्हिडिओ शूट केला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल

ताज महालमध्ये नमाज पठणाचा व्हिडिओ हा रविवारचा असल्याचे सांगण्यात येत आहे. ताज महाल ही एक ऐतिहासिक वास्तू असून ते एक पर्यटन स्थळ आहे. त्यामुळे ताज महालमध्ये कोणतीही धार्मिक कृती करण्यास सक्त मनाई आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ रविवारचा असल्याचे बोलले जात आहे. ताज महालच्या आत असलेल्या शाही मशिदीत केवळ स्थानिकांनाच नमाज पठण करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच रमजानच्या महिन्यात, ईद आणि बकरी ईदच्या दिवशी सकाळी नमाज पठण करण्यास परवानगी आहे.

(हेही वाचाः राज्यपालांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल, पदावरुन हटवण्याची मागणी)

चौकशी होणार

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची पुरातत्व विभागाकडून चौकशी करण्यात येणार आहे. सध्या ताज महालमध्ये पर्यटकांची गर्दी जास्त आहे. त्यामुळे हा प्रकार नेमका कधी घडला हे आम्हाला कळू शकलेले नाही. तरीही या व्हिडिओची चौकशी करण्यात येऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे पुरातत्व विभागाचे अधिकारी डॉ. राजकुमार पटेल यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here