Nanded: खळबळजनक ! नांदेडमध्ये ३९१ मशीन गनचे राऊंड सापडले; कसा लागला शोध?

200
Nanded: खळबळजनक ! नांदेडमध्ये ३९१ मशीन गनचे राऊंड सापडले; कसा लागला शोध?

नांदेड शहराजवळील पावडे वाडी भागात निर्जन ठिकाणी असलेल्या नाल्यात मशीन गनचे ३९१ राऊंड सापडले. ही घटना शनिवारी, (१ जून) मध्यरात्री उघडकीस आली. या घटनेमुळे नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे. (Nanded)

पावडे वाडी ते गुरुजी चौक रस्त्यावर एका निर्जन परिसरात एक शेतमजूर मोहोळ झाडण्यासाठी गेला असताना कालव्यात त्याला गोळ्या असलेले २ पट्टे आढळले. कुतूहलापोटी त्याने हे पट्टे घरी नेले. त्याच्या वडिलांना संशय आल्यानंतर त्यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याला त्याचे फोटो काढून पाठवले. (Nanded)

(हेही वाचा – PUNE: हडपसर परिसरात कोयता गँगचा धुमाकूळ, दुकानांची तोडफोड; वाचा नक्की काय घडले?)

मशीन गनचे राऊंड जप्त
पोलीस कर्मचाऱ्याने लगेच ही बाब वरिष्ठांना कळविली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर हे राऊंड जप्त करण्यात आले आहेत. हे राऊंड अनेक दिवसांपासून या ठिकाणी पडून असल्याने गंजले होते. दरम्यान या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.