नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शौचालये स्वच्छ करायला लावल्याच्या प्रकरणी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या विरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. (Nanded) नांदेड येथील शासकीय रुग्णालयातील मृत्यूकांडाच्या घटनेनंतर खासदार हेमंत पाटील यांनी शासकीय रूग्णालयाला भेट दिली. त्यांनी अतिगंभीर असलेल्या रूग्णांच्या नातेवाईकांची भेट घेतली. त्यांच्याशी बोलून त्यांना धीर दिला. या वेळी खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयातील अधिकारी, डॉक्टरांकडून परिस्थितीची माहिती घेतली. (Nanded)
(हेही वाचा – SRA : एसआरए वसाहतींमधील प्रसाधन गृहांची तपासणी करणार महापालिका )
या भेटीदरम्यान रुग्णालयाची पाहणी करताना रूग्णालयातील शौचालये अत्यंत अस्वच्छ असल्याचे आढळून आले. या वेळी संतापलेले खासदार पाटील यांनी रुग्णालयाचे अधिष्ठाता अन् अधिकाऱ्यांना तेथील शौचालये स्वच्छ करायला लावले. या घटनेनंतर राज्यभरातील डॉक्टरांनी संताप व्यक्त केला. अखेर खासदार हेमंत पाटलांवर नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वतः डीन डॉ. एस. आर. वाकोडे यांनी तक्रार दाखल केली. ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीश भांडारवाड यांनी ही माहिती दिली. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात हेमंत पाटील आणि अन्य १० ते १५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Nanded)
नांदेड येथील शासकीय रूग्णालय व महाविद्यालय प्रशासनाच्या अनास्थेमुळे तब्बल ३१ जणांचा बळी गेला आहे. त्यामध्ये १६ नवजात बालकांचा समावेश आहे. या घटनेमुळे आणि रुग्णालयाची दयनीय अवस्था झाल्याने खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. श्याम वाकोडे यांना टॉयलेट स्वच्छ करायला लावले होते.
सेंन्ट्रल मार्ड आक्रमक
खासदार हेमंत पाटील यांनी झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागावी. घडलेल्या प्रकारामुळे फक्त अधिष्ठाता यांचे मानसिक खच्चीकरण झालेले नाही तर संपूर्ण डॉक्टरांसाठी अपमानास्पद गोष्ट आहे. हेमंत पाटील यांनी माफी न मागितल्यास डाॅक्टर्स महाराष्ट्रभर आंदोलन करतील, असा इशारा सेंन्ट्रल मार्डने दिला आहे. राज्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडल्यास सरकार जबाबदार राहणार, अशी भूमिका सेंट्र्ल मार्डने घेतली आहे. (Nanded)
या प्रकरणाचे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांमध्येही तीव्र पडसाद उमटले. ‘राजकारण राजकारणाच्या जागी करा, स्टंटबाजीला आमचा विरोध आहे’, असे म्हणत या विद्यार्थ्यांनी काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
खासदार हेमंत पाटील यांचे स्पष्टीकरण
‘रुग्णालयात 260 कर्मचारी स्वच्छतेसाठी आहेत. 36 रुग्ण दगावल्यानंतरही अधिकारी स्वतः चेंबरमधून बाहेर येत नाही आणि यामुळे प्रचंड अनास्था या रुग्णालयात पाहायला मिळत आहे. रुग्णालयातील अनास्थेच्या चिडीपोटी मी हे कृत्य केले आहे आणि त्यांनीच नाहीतर मी स्वतः देखील सफाई केलेली आहे’, असे स्पष्टीकरण खासदार हेमंत पाटील यांनी दिले आहे. (Nanded)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community