विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ४ ऑक्टोबर रोजी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात पाहणी केली. (Nanded) यावेळी त्यांनी अधिष्ठाता डॉ. एस आर वाकोडे यांच्याकडून औषधांचा साठा, रिक्त डॉक्टर आणि कर्मचारी संख्या याची माहिती घेतली. त्यांनी रुग्णालयातील बाल रोग विभाग, तसेच वॉर्ड मध्ये जाऊन पाहणी केली. त्यांनी रुग्णांकडून, तसेच त्यांच्या नातेवाईकांकडूनही वस्तूस्थिती जाणून घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना अंबादास दानवे यांनी डॉक्टरांवर आणि सरकारवर बेपर्वाई करत असल्याचे आरोप केले. ‘विजयमाला कदम या रुग्ण ७ वाजता दाखल झाल्या. त्यांचे सीझर रात्री ३ वाजता झाले. कदम यांच्या नातेवाईकांनी सांगितले की, तेथील डॉक्टरांचा वाढदिवस होता; म्हणून सीझर उशिरा झाले. वेळेवर झाले असते, तर ती माता आणि बाळ दोन्ही वाचले असते. ही डॉक्टरांची बेपर्वाई आहे. सरकारने याकडे लक्ष दिले असते, तर डॉक्टर अशी हिंमत करू शकत नाहीत’, असे आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले आहेत. (Nanded)
(हेही वाचा – Flash Floods In Sikkim : सिक्कीममध्ये अचानक आलेल्या पुरामुळे लष्कराचे मोठे नुकसान, 23 जवान बेपत्ता)
यावेळी अंबादास दानवे पुढे म्हणाले, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, नागपूर यांसह राज्यातील शासकीय रुग्णालयांत मृत्यूचे तांडव सुरू आहे; परंतु खोक्याचे हे सरकार जागचे हलायला तयार नाही. हे सरकारच व्हेंटिलेटरवर आहे. हे सरकार खोटे बोलत आहे, रुग्णालयात औषधी नसताना मुबलक साठा असल्याचे छातीठोकपणे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात गोरगरीब रुग्णांना बाहेरून औषधी आणावी लागत आहे. पदे रिक्त आहेत. मंत्री आले आणि पाहणी करून गेले. त्यानंतर ही मृत्यूची मालिका सुरूच आहे. या सर्व मृत्यूला हे सरकार जबाबदार आहे. आता तरी सरकारचे डोळे उघडावे. (Nanded)
नांदेड, छत्रपती संभाजी नगर, नांदेड, नागपूर यासह राज्यातील शासकीय रुग्णालयांत अनेक रुग्णांचे मृत्यू होत आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक नेते या विषयावर सरकारवर टीका करत आहेत. (Nanded)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community