Nanded : धक्कादायक ! एकाच दिवसात २४ रुग्णांचा मृत्यू , १२ बालकांचा समावेश

या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेची कारभाराबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.

162
Nanded : धक्कादायक ! एकाच दिवसात २४ रुग्णांचा मृत्यू , १२ बालकांचा समावेश
Nanded : धक्कादायक ! एकाच दिवसात २४ रुग्णांचा मृत्यू , १२ बालकांचा समावेश

काही दिवसांपूर्वीच ठाणे येथील महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत १८ रुग्ण दगावल्याची घटना ताजी असतानाच नांदेड शहरातील शासकीय रुग्णालयात एका दिवसात २४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये १२ नवजात बालकांचा समावेश आहे. तर रुग्णालयात औषधांचा तुटवडा निर्माण झाला असल्याने रुग्णांना आपला जीव गमवावा लागला असल्याचे अनेकांकडून सांगितले जात आहे. तर याबाबत नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. (Nanded)
हाफकीनने औषधी खरेदी बंद केल्यामुळे राज्यभरातील शासकीय रुग्णालयात औषधांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे.
रुग्णालयात वेळेवर औषधे पुरवठा झाला नसल्याने रुग्णांना आपला जीव गमवावा लागला असल्याचा आरोप केला जात आहे. असाच धक्कादायक प्रकार नांदेडमधल्या शासकीय रुग्णालयात पुढे आला आहे.

(हेही वाचा : Nobel Prize 2023 : कोविड लस निर्मितीत ‘या’ शास्त्रज्ञांचे महत्त्वाचे योगदान, औषधशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर)

गेल्या २४ तासात २४ रुग्णांचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे यात १२ नवजात बालकांचाही मृतात समावेश आहे. या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेची कारभाराबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. या घटनेमुळे नांदेडमध्ये एकच खळबळ उडाली असून, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

हेही पहा –

 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.