Nanded-Pune Express: नांदेड-पुणे एक्स्प्रेस नव्या वेळेत धावणार, १ ऑक्टोबरपासून नवीन वेळापत्रक लागू

नगरसोल स्थानकावर सात गाड्यांची वेळ बदलणार

206
Pune Division of Central Railway: पुणे-कोल्हापूर एक्स्प्रेस २१ व २३ फेब्रुवारीला रद्द
Pune Division of Central Railway: पुणे-कोल्हापूर एक्स्प्रेस २१ व २३ फेब्रुवारीला रद्द

दक्षिण मध्य रेल्वेचे १ ऑक्टोबरपासून नवीन वेळापत्रक लागू केले जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावरून (Chhatrapati Sambhajinagar Railway Station) जालना नगरसोल आणि नांदेड-पुणे एक्स्प्रेस (Nanded-Pune Express)  या दोन रेल्वेच्या वेळापत्रक बदल करण्यात आला आहे. २४ रेल्वे स्थानकांवरील ८० गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत.

नवीन वेळापत्रकात १ ते १० मिनिटांचा फरक आहे. यात मनमाड ते जालना मार्गावर धावणाऱ्या रेल्वेचे वेळापत्रक एक ते पाच मिनिटांनी कमी करण्यात आले आहे. बहुतेक रेल्वे सुटण्याची वेळ तीच ठेवण्यात आली आहे. यामुळे रेल्वेतून प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना विविध स्थानकांवर एक ते आठ मिनिटे थांबावे लागणार आहे. छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर जालना-नगरसोल विशेष पॅसेंजर (Jalna-Nagarsol Special Passenger) रेल्वे सकाळी ७ वाजून ९ मिनिटांनी येत होती. ती १ ऑक्टोबरपासून ७.०८ दरम्यान स्थानकावर पोहोचणार आहे.

(हेही वाचा – LPG Commercial Gas Cylinders : महिन्याच्या पहिल्याच दिवशी सिलिंडरच्या किमतींत लक्षणीय वाढ)

निघण्याची वेळ पूर्वीप्रमाणे ७ वाजून १० मिनिटांचीच आहे याशिवाय नांदेड-पुणे एक्स्प्रेस पूर्वी रात्री ८.३० ला स्थानकावर येत होती तसेच ८.३५ला निघत होती. ती ८.२० ला म्हणजे दहा मिनिटे आधी पोहोचणार आहे. तिची निघण्याची वेळ दहा मिनिटे आधी म्हणजेच ८.२५ ला पुण्याकडे निघेल.

नगरसोल स्थानकावर सात गाड्यांच्या वेळत बदल
नवीन वेळापत्रकानुसार, नगरसोल स्थानकावरील सात गाड्यांच्या वेळेतही बदल होणार आहे. यात नांदेड-मनमाड पॅसेंजर पूर्वी ४.२०ला येत होती. ती आता आठ मिनिटे उशिरा ४.२८ ला निघणार आहे. दौंड ते निझामाबाद ही रेल्वे एक मिनिट आधी म्हणजेच रात्री ११.२३ ला येणार आहे. निझामाबाद-पुणे एक्सप्रेस सकाळी ९.५८ ला म्हणजेच पूर्वीच्या वेळापत्रकापेक्षा एक मिनिट आधी पोहोचणार आहे. रामेश्वरम ओखा तीन मिनिटे उशिरा येणार आहे. मनमाड-सिकंदराबाद रात्री ९.१५ वाजता सुटणार आहे. मनमाड-धर्माबाद पूर्वी ३.३४ ला येत होती. ती आता ३.३० ला नगरसोल स्थानकावर येणार आहे.

परभणीत ९ स्थानकांच्या वेळापत्रकात बदल
मराठवाड्यातील जालना, परतूर आणि सेलू येथे नांदेड-पुणे एक्सप्रेसची वेळ बदलणार आहे. ही रेल्वे १० मिनिटे आधी येईल. परभणी स्थानकात ९ गाड्यांच्या वेळापत्रकात ५ ते १० मिनिटांचा बदल केला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.