४ जुलैपासून नांदेड- पुणे एक्स्प्रेस रोज धावणार!

111

आठवड्यातून दोनदा धावणारी नांदेड ते पुणे एक्स्प्रेस आता रोज धावणार आहे. मराठवाड्यातील प्रवाशांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. अशी माहिती केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. मराठवाडा विभागाचा पुणे शहराशी संपर्क वाढवण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने गाडी क्रमांक 12730/12729 ची वारंवारता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दिनांक 4 जुलै, 2022 पासून नांदेड-पुणे-नांदेड ही दैनंदिन रेल्वे सेवा सुरु होणार आहे.

४ जुलैपासून नांदेड- पुणे एक्स्प्रेस रोज धावणार

पूर्वीचे नांदेड-हडपसर एक्स्प्रेसचे स्थानक बदलून ते पुणे करण्यात आले आहे, यामुळे मराठवाड्यातून पुण्याला प्रवास करणाऱ्या मराठवाड्यातील लोकांसाठी हे सोयीस्कर झाले आहे. मराठवाड्यातील लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी रात्रीच्या सोयीच्या वेळेनुसार ही रेल्वे गाडी चालवली जात आहे, जेणेकरून सकाळी लवकर पुणे स्टेशनवर पोहोचता येईल.

  • गाडी क्रमांक 12730 नांदेड – पुणे एक्स्प्रेस नांदेड स्थानकातून दररोज दुपारी 03.15 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 05.30 वाजता पुणे स्थानकावर पोहोचेल.
  • परतीच्या प्रवासात, गाडी क्रमांक 12729 पुणे – नांदेड एक्स्प्रेस पुणे स्थानकातून रात्री 09.35 वाजता सुटेल आणि नांदेड स्थानकावर सकाळी 10.00 वाजता पोहोचेल.

( हेही वाचा : बेस्ट कामगारांचा असंतोष दूर करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील! ड्युटी शेड्युलमध्ये सुधारणा होणार?)

ट्रेन मराठवाड्यातील आणि महाराष्ट्र राज्यातील औद्योगिक आणि शैक्षणिक केंद्र असलेल्या पुणे दरम्यान थेट कनेक्टिव्हिटी प्रदान करते. आरामदायक प्रवासात वाढ करण्यासाठी आणि आधुनिक सुविधा देण्यासाठी, ट्रेनमध्ये नवीन अत्याधुनिक LHB कोच (डब्बे) जोडण्यात आले आहेत, जे प्रवाशांना आरामदायक प्रवासाचा नवीन अनुभव देईल. प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता यावा या उद्देशाने डब्यांच्या आत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.