सध्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यात (Nanded Rain) मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. त्यामुळे काही भागांतील जनजीवन देखील विस्कळीत झालं आहे.
दरम्यान मागील काही दिवसांपासून नांदेड (Nanded Rain) जिल्ह्यात देखील मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर शुक्रवारी (२८ जुलै) देखील जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे जिल्ह्यातील 57 मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले आहे. तर शेकडो एकर पाण्याखाली गेल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, जिल्हा प्रशासन प्रत्येक परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
(हेही वाचा – Buldhana Bus Accident : मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त; मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहीर)
जिल्ह्यातील अतिवृष्टीबाबत प्रशासन सतर्क
शुक्रवार, 28 जुलै रोजी नांदेड (Nanded Rain) जिल्ह्यातील 57 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे. सद्यस्थितीत नांदेड जिल्ह्यात पाऊस थांबलेला आहे. बेल्लोरी किनवट येथील बेलोरी नाल्या वरून एक व्यक्ती वाहुन गेली असून, ज्यांचे नाव अशोक पोशट्टी दोनेवार (वय 40 वर्ष) आहे. भोई समाजाचे लोक मदतीला घेऊन शोध बचावकार्य चालू होते. तर मुखेड तालुका मौजे राजुरा येथील युवक प्रदीप साहेबराव बोयाळे (वय वर्ष 25) पाण्याच्या प्रवाहात वाहुन गेल्याची प्राथमिक माहिती असून, त्याचा मृतदेह सापडला आहे.
धर्माबाद तालुक्यातील (Nanded Rain) बनाळी येथे अति पावसामुळे 60 ते 70 कुटुंबाचे दोन बसेस द्वारे धर्माबाद येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये स्थलांतर करण्यात आलेले आहे. उमरी तालुक्यात बेलदरा ते उमरी रस्ता बंद आहे. किनवट तालुक्यातील इस्लापूर येथील साईबाबा मंदिराजवळील नाल्याचे पाणी पुलावरून जात असताना एक व्यक्ती या पाण्यात अडकली होती. त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी महसूल विभागाचे तलाठी बालाजी वसमतकर हे स्वतः पाण्यात उतरले. त्यानंतरही पाण्याचा प्रवाह वाढतच होता. त्यामुळे प्रशासनाच्या पुढाकाराने JCB च्या मदतीने सदर इसम आणि तलाठी वसमतकर यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
तसेच नांदेड जिल्ह्यात (Nanded Rain) पूर परिस्थितीमुळे तब्बल 378 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community