Nanded to Pune Flight: नागपूरकरांसाठी आनंदाची बातमी; जूनच्या ‘या’ तारखेपासून नांदेड ते पुणे विमानसेवा सुरू होणार

501
Nanded to Pune Flight: नागपूरकरांसाठी आनंदाची बातमी; जूनच्या ‘या’ तारखेपासून नांदेड ते पुणे विमानसेवा सुरू होणार

येत्या २७ जूनपासून स्टार एअरद्वारे (Star Air) नागपूर ते नांदेड ही विमानसेवा सुरू करण्यात येत आहे. हे विमान नागपूरहून आठवड्यातून चार दिवस सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवारी सकाळी ९.१५ वाजता निघून नांदेडला सकाळी १०.०५ वाजता पोहोचेल. त्याचप्रमाणे नांदेडहून दुपारी दीड वाजता विमान उड्डाण करून दुपारी तीन वाजता नागपूरला पोहोचेल. सध्या स्टार एअरद्वारे अजमेर आणि बेळगावसाठी विमानसेवा सुरू आहे. त्यानंतर आता नागपूर-नांदेड ही विमानसेवा (Nagpur-Nanded flight service) सुरू होत आहे. (Nanded to Pune Flight)

या विमानात एकूण ७६ सिट असून त्यात १२ बिझनेस आणि ६४ इकॉनॉमी क्लासच्या सिट आहे. तिकीट दर साडेतीन हजार राहिल. हे विमान बंगळुरूहून नागपुरला येईल. नागपुरहून नांदेडला जाईल. नांदेडहून पुण्याला. पुण्याहून परत नांदेड आणि नांदेडहून परत नागपूर व येथूत बंगळुरू अशा फेऱ्या राहिल. 

(हेही वाचा – Vidhan Sabha Election 2024: शिवसैनिकांना मुख्यमंत्र्यांचे आवाहन; आता विधानसभेच्या तयारीला लागा)

काही दिवसांपूर्वीच इंडिगो एअरलाइन्सद्वारे (Indigo Airlines) येत्या २ जुलैपासून नागपूर ते औरंगाबाद विमानसेवा (Nagpur to Aurangabad Airlines) सुरू होण्याची घोषणा झाली आहे. इंडिगो आठवड्यातून दोन दिवस म्हणजे मंगळवार आणि गुरुवार उड्डाण ही विमानसेवा सुरू करणार आहे. विदर्भ आणि मराठवाडा या दोन प्रदेशांना जोडणाऱ्या दोन विमानसेवा या निमित्ताने सुरू होताहेत. परिणामतः मराठवाड्यातील संभाजी नगर आणि नांदेड अशा दोन मुख्य शहरांशी नागपूरची कनेक्टिव्हिटी साधली जाणार आहे.  (Nanded to Pune Flight)

(हेही वाचा –Deep Sea Mission: खोल समुद्रात शोध मोहीम राबवणारा भारत ठरणार जगातील सहावा देश)

नागपूर पर्यायाने विदर्भातून मराठवड्यात जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. संभाजी नगर आणि नांदेड येथे दररोज खासगी बसेसने प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण पाहता विमानसेवेलादेखील चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

 हेही पाहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.