नंदूरबार जिल्हा ‘यासाठी’ ठरला सर्वोत्कृष्ट, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार सत्कार!

123

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत कोविड कालावधीत नंदुरबार जिल्ह्यात सॅम व मॅम बालकांच्या स्क्रिनींगसाठी विशेष मोहिम राबवून इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जास्तीत जास्त बालकांचे स्क्रिनींग केल्याबद्दल नंदुरबार राज्यात सर्वोत्कृष्ट जिल्हा ठरला आहे. त्यामुळे या जिल्ह्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे.

मुंबईत होणार सत्कार

कोरोना कालावधीत जिल्ह्यात विशेष मोहिम राबवून 3 हजार 368 सॅम बालकांचे व 18 हजार 668 मॅम बालकांचे स्क्रिनींग केल्याबद्दल नंदुरबार जिल्ह्याची सर्वोकृष्ट जिल्हा म्हणून निवड करण्यात आली आहे. येत्या 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी कृष्णा राठोड यांचा सत्कार राज्याचे मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री तसेच महिला व बाल विकास मंत्री तसेच राज्यमंत्री, महिला व बाल विकास यांच्या उपस्थित सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे होणार आहेत. या सोहळ्यास संबंधित अधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याबाबत एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त रूबल अग्रवाल यांनी कळवले आहे.

( हेही वाचा: नवाब मलिक गर्दुल्ले आहेत! मोहित कंबोजांनी दाव्यासह केला आरोप  )

म्हणून ही मोहिम

कोरोना आणि पावसामुळे कुपोषण वाढण्याची शक्यता असल्याने, महिला व बालविकास विभागाने नंदूरबार पॅटर्न राज्यभर राबवण्यास सुरुवात केली आहे. कुपोषणाच्या समस्येचा सखोल अभ्यास केल्यानंतर महिला व बालविकास विभागाच्या मंत्री ॲड यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गर्भवती महिला, स्तनदा माता, किशोरवयीन मुली तसेच सॅम-मॅम श्रेणीतील बालकांच्या आरोग्य तपासणीसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.