Narayan Murthy : ‘७० तास कामाची सक्ती होऊ शकत नाही, मी अनुभव सांगितला’ – नारायण मूर्ती

Narayan Murthy : नारायण मूर्तींनी आपल्या पहिल्या विधानाचं स्पष्टीकरण दिलं आहे.

56
Narayan Murthy : ‘७० तास कामाची सक्ती होऊ शकत नाही, मी अनुभव सांगितला’ - नारायण मूर्ती
  • ऋजुता लुकतुके

इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती (Narayan Murthy) यांनी अलीकडेच तरुणांनी आठवड्यातून ७० काम करावं असा सल्ला काही आठवड्यापूर्वी तरुणांना दिला होता. त्यावर बराच वादही निर्माण झाला. काम आणि खाजगी आयुष्य यावर चर्चा होत राहिल्या. त्यानंतर मूर्तींनी प्रथमच आपल्या वक्तव्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. ‘कुणालाही जबरदस्तीने ७० तास काम करायला लावायचं हा माझा हेतू नव्हता. मी माझा अनुभव सांगत होतो,’ असं त्यांनी म्हटलं आहे.

नारायण मूर्ती (Narayan Murthy) यांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात तरुण प्रोफेशनल्सना त्यांच्या कारकीर्दीत यशस्वी होण्यासाठी अधिक मेहनत करायला पाहिजे असा सल्ला दिला होता. नारायण मूर्ती यांच्या या वक्तव्याने अनेक जण नाराज झाले होते. नारायण मूर्ती म्हणाले ते वक्तव्य कामासाठी अधिक दबाव टाकण्याच्या अंगानं पाहिलं गेलं. आता नारायण मूर्ती यांनी त्यांच्या वक्तव्यावर पुनर्विचार करत म्हटलं की कुणालाही दीर्घकाळ काम करण्यासाठी भाग पाडलं जाऊ शकत नाही.

(हेही वाचा – अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणारे 18 हजार भारतीय मायदेशी परतणार; S. Jaishankar यांची माहिती)

सोमवारी मुंबईत आयोजित किलाचंद स्मृती व्याख्यान कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले मी माझ्या करिअरमध्ये चाळीस वर्षांपर्यंत दर आठवड्याला ७० तासांपेक्षा अधिक काम केलं आहे. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. याचा अर्थ इतर कोणी तसं करावं असा नाही. नारायण मूर्ती (Narayan Murthy) पुढे म्हणाले, प्रत्येक व्यक्तीने आपली स्थिती आपल्या गरजा यानुसार निर्णय घेतले पाहिजेत.

नारायण मूर्ती (Narayan Murthy) पुढे म्हणाले हा काही नियम नाही हा फक्त माझा अनुभव आहे. प्रत्येक व्यक्तीनं आपल्या क्षमता आणि परिस्थितीनुसार काम केलं पाहिजे. नारायण मूर्ती पुढे असेही म्हणाले की कामाच्या तासांपेक्षा आपलं काम समाजासाठी किती फायदेशीर आहे हे महत्त्वाचं आहे. नारायण मूर्ती यांनी या मुद्द्यावर वाद विवाद करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करण्यावर जोर दिला. ते म्हणाले जो सल्ला मी दिला होता त्यावर अधिक चर्चा किंवा वादविवाद करण्याची गरज नाही. त्यापेक्षा हे महत्त्वाचं आहे की प्रत्येक व्यक्ती स्वतःहून विचार करून त्यांच्यासाठी काय योग्य आहे हे ठरवेल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.