- ऋजुता लुकतुके
प्रख्यात बँकर आणि आयसीआयसीआय बँकेचे माजी अध्यक्ष नारायणन वाघुल (Narayanan Vaghul) यांचे निधन झाले आहे. ८८ व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला आहे. नारायणन वाघुल यांच्या निधनाची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. शनिवारी दुपारी साडे बारा वाजता त्यांना व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले आणि त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. (Narayanan Vaghul Death)
नारायणन वाघुल (Narayanan Vaghul) यांना २००९ साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आल होतं. नारायणन वाघुल यांना आयसीआयसीआय बँकेतील अनेक मोठ्या बदलांचे श्रेय जाते. १९८५ मध्ये त्यांनी आयसीआयसीआयचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार स्वीकारला होता. आयसीआयसीआय बँकेला सार्वजनिक वित्तीय संस्थेतून देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकांच्या यादीत नेण्यासाठी वाघुल यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्याच प्रयत्नातून आयसीआयसीआयला १९९४ मध्ये बँकेचा दर्जा मिळाला. (Narayanan Vaghul Death)
(हेही वाचा – मुंबईला अतिरेक्यांच्या ताब्यात देण्याचा Uddhav Thackeray यांचा प्लॅन; दिपक केसरकर यांची घणाघाती टीका)
सन १९९६ मध्ये नारायणन वाघुल (Narayanan Vaghul) हे आयसीआयसीआय बोर्डमधून बाजूला झाले आणि २००९ पर्यंत ते गैर-कार्यकारी अध्यक्षपदावर राहिले. केंद्र सरकारने वाघुल यांना २००९ साली व्यापार आणि उद्योग श्रेणीतील देशातील तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मभूषण देऊन सन्मानित केले. वाघुल हे बँक ऑफ इंडियाचे सर्वात तरुण अध्यक्षही होते. वयाच्या ४४ व्या वर्षी त्यांना बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष बनवण्यात आले. (Narayanan Vaghul Death)
गेल्या वर्षी नारायणन वाघुल (Narayanan Vaghul) यांच्या ‘रिफ्लेक्शन्स’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आलं होतं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या हस्ते त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं होतं. त्यावेळी बँकिंग क्षेत्रातले अनेक दिग्गज उपस्थित होते. नारायणन वाघुल यांचा बँकिंग क्षेत्रातला मोठा अभ्यास होता. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग मॅनेजमेंटमध्ये त्यांनी अध्ययानाचं कामही केलं आहे. तसेच त्यांनी सेंट्रल बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून देखील काम केलं. (Narayanan Vaghul Death)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community