भारताला सौरऊर्जेमध्ये आत्मनिर्भर करण्यासाठी प्रधानमंत्री (Narendra Modi) सूर्य घर योजना (Surya Ghar Yojana) केंद्र सरकाने जाहीर केली असून या योजनेच्या सर्वेक्षणाची जबाबदारी डाक विभागाला देण्यात आली आहे. या योजनेच्या सर्वेक्षणासाठी येणाऱ्या पोस्ट विभागाच्या कर्मचाऱ्यांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रवर डाक अधीक्षक प्रतापराव सोनवणे यांनी केले आहे.
प्रधानमंत्री सूर्य घर योजनेतून देशातील १ कोटी कुटुंबाना महिन्याला ३०० युनिटपर्यंत मोफत वीज पुरविण्याचा केंद्र सरकारचा उद्देश आहे. या योजनेद्वारे एक कोटी घरांना सवलतीच्या दरात सौर पॅनल उपलब्ध करून देण्यात येणार असून या योजनेची माहिती देण्यासाठी व नोंदणी करण्यासाठी गावागावांत पोस्ट खात्याचे कर्मचारी प्रधानमंत्री सूर्य घर योजनेसाठी सर्वेक्षण करणार आहेत. या सर्वेक्षणासाठी नागरिकांनी पोस्ट विभागाच्या कर्मचाऱ्यांना सर्वेक्षणात मदत करावी तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी सर्वेक्षणात नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सोनवणे यांनी केले आहे.
(हेही वाचा –Bangalore Blast : बंगळुरुतील रामेश्वरम कॅफेमध्ये स्फोट, ५ जण जखमी )
Join Our WhatsApp Community