ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत लेबर पार्टीच्या दणदणीत विजयानंतर केयर स्टार्मर (British Prime Minister Keir Starmer) यांनी शुक्रवारी ब्रिटनचे नवीन पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याशी फोनवर बोलून अभिनंदन केले. मोदींनी एक्स म्हणजेच ट्वीटरवर पोस्ट करून ही माहिती दिली. (Narendra Modi)
त्यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, “आम्ही भारत आणि ब्रिटनमधील धोरणात्मक भागीदारी आणि आर्थिक संबंध मजबूत करण्यासाठी वचनबद्ध आहोत. पंतप्रधान मोदींनी ब्रिटनचे नवीन पंतप्रधान स्टार्मर यांनाही लवकरच भारत भेटीचे निमंत्रण दिले आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी ब्रिटनच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विकासात भारतीय समुदायाच्या लोकांच्या योगदानाची प्रशंसा केली. (Narendra Modi)
(हेही वाचा – BMC अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची प्रतिनियुक्ती नोव्हेंबर २०२९ पर्यंत?)
भारतीय वंशाचे पहिले ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाला निवडणुकीत दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. आपला पराभव मान्य करत ऋषी सुनक यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला.
Heartiest congratulations and best wishes to @Keir_Starmer on the remarkable victory in the UK general elections. I look forward to our positive and constructive collaboration to further strengthen the India-UK Comprehensive Strategic Partnership in all areas, fostering mutual…
— Narendra Modi (@narendramodi) July 5, 2024
यावेळी 650 सदस्यांच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये केयर स्टार्मरच्या मजूर पक्षाने 412 जागा जिंकल्या. 2019 मधील गेल्या निवडणुकीत मिळालेल्या जागांपेक्षा ही संख्या 211 अधिक आहे. सुनक यांच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाने 121 जागा जिंकल्या, ज्या गेल्या निवडणुकीत जिंकलेल्या 250 जागांपेक्षा कमी आहेत. (Narendra Modi)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community