पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) रविवारी, दुपारी 12 वाजता सर्वोच्च न्यायालयाच्या हिरक महोत्सवी समारंभाचे उद्घाटन करणार आहेत. नागरिक केंद्रित माहिती आणि तंत्रज्ञान उपक्रमांचाही पंतप्रधान शुभारंभ करणार आहेत. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा डिजिटल अहवाल (डीजी एससीआर), डिजिटल कोर्ट 2.0 आणि सर्वोच्च न्यायालयाचे नवीन संकेतस्थळ यांचा समावेश आहे. यावेळी ते जाहीर सभेलाही संबोधित करतील.
भारतीय जनता पक्षाने (भाजप) आपल्या अधिकृत “X”हँडलवर पंतप्रधान मोदींच्या या कार्यक्रमाची संक्षिप्त सचित्र माहिती पोस्ट केली आहे. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या (PIB)कडून मिळालेल्या माहितीनुसार, हा कार्यक्रम सर्वोच्च न्यायालयाच्या सभागृहात होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचा डिजिटल अहवाल (एस. सी. आर.) सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय देशातील नागरिकांना विनामूल्य आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रदान करेल. डिजिटल एस. सी. आर. चे ठळक वैशिष्ट्य म्हणजे 1950 पासून 36,308 प्रकरणांचा समावेश असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या अहवालाचे सर्व 519 खंड डिजिटल स्वरूपात, बुकमार्क केलेले, वापरकर्त्यासाठी अनुकूल आणि खुल्या प्रवेशासह उपलब्ध असतील.
(हेही वाचा – Nitesh Rane Controversial Statement : “पोलीस माझं काही वाकडं करु शकणार नाही, आपला बॉस …” )
पीआयबीच्या म्हणण्यानुसार, डिजिटल कोर्ट 2.0 ऍप्लिकेशन हा ई-कोर्ट प्रकल्पांतर्गत जिल्हा न्यायालयांच्या न्यायाधीशांना इलेक्ट्रॉनिक स्वरूपात न्यायालयीन नोंदी प्रदान करण्याचा हा अलीकडील उपक्रम आहे. नवीन संकेतस्थळ इंग्रजी आणि हिंदी (द्विभाषिक स्वरूपात) असेल.
हेही पहा –