सोशल मिडियामुळे अलिकडे सायबर गुन्हेगारीच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. त्यामुळे मोबाईलवर येणाऱ्या लिंक, मेसेजची पडताळणी करूनच मेसेज इतरत्र पाठवणे गरजेचे आहे. सध्या असाच एक मेसेज सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. मोदी सरकार प्रधानमंत्री ज्ञानवीर योजनेंतर्गत नोंदणी करणाऱ्या प्रत्येक तरुणांना ३४०० रुपये देणार असा दावा या मेसेजमध्ये केला आहे.
( हेही वाचा : मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूरमध्ये होणार जी २० परिषदेच्या बैठका)
हा व्हायरल मेसेज पूर्णपणे खोटा असून या मेसेजवर क्लिक करणे धोकादायक ठरू शकते. हा दावा पूर्णपणे खोटा असून सर्वसामान्यांना फसवण्यासाठी असे संदेश सोशल मिडियाच्या माध्यमातून पसरवले जात आहे. यासंदर्भात पीआयबी फॅक्ट चेकने ट्वीट करत नागरिकांना सतर्क केले आहे.
व्हायरल मेसेजवर विश्वास ठेऊ नये
सरकार अनेक प्रकारच्या योजना राबवत असते परंतु या योजनांची माहिती संबंधित विभाग किंवा मंत्रालयाच्या संकेतस्थळावर स्पष्टपणे दिली जाते. त्यामुळे नागरिकांनी अशा व्हायरल मेसेजवर विश्वास न ठेवता कोणत्याही योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर त्यांनी संबंधित विभागात जाऊन माहिती घ्यावी. तसेच कोणत्याही अज्ञात व्यक्ती किंवा अज्ञात स्त्रोताकडून मिळालेल्या माहितीवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन पीआयबी फॅक्ट चेकच्या माध्यामातून करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Communityदावा: प्रधानमंत्री ज्ञानवीर योजना के तहत पंजीकरण करने पर सभी युवाओं को प्रति माह ₹3,400 दिए जाएंगे। #PIBFactCheck
▶️यह दावा फ़र्ज़ी है।
▶️इस तरह की किसी वेबसाइट/लिंक पर अपनी निजी जानकारी साझा न करें।
▶️ऐसे संदेशों को फॉरवर्ड करने से पहले #FactCheck जरूर कर लें। pic.twitter.com/w8RDL4MTMr
— PIB Fact Check (@PIBFactCheck) November 29, 2022