Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर आयएएडीबी परिषदेचे उद्घाटन

सांस्कृतिक संवाद बळकट करण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

169
Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर आयएएडीबी परिषदेचे उद्घाटन
Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर आयएएडीबी परिषदेचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) शुक्रवारी, ८ डिसेंबरला सायंकाळी ४ वाजता लाल किल्ल्यावर होणाऱ्या पहिल्या भारतीय कला, वास्तुकला आणि रचना द्विवार्षिक (आयएएडीबी) परिषद २०२३चे उद्घाटन करणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान आत्मनिर्भर भारत डिझाईन केंद्र आणि सामुन्नती या द्विवार्षिक विद्यार्थी परिषदेचेही उद्घाटन करतील.

आयएएडीबीची परिषद 15 डिसेंबर रोजी संपेल. परिषदेच्या पूर्वसंध्येला जारी केलेल्या पीआयबीच्या प्रसिद्धीपत्रकातील माहितीनुसार, अलीकडे मे २०२३ मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय संग्रहालय एक्स-पो (२० मे) आणि ग्रंथालय महोत्सव (ऑगस्ट 2023) यासारखे प्रमुख उपक्रमही यावेळी राबवले जाणार आहेत.

(हेही वाचा – MLA Disqualification: आमदार अपात्रता सुनावणी लांबणीवर? ३१ डिसेंबर आधी शक्य न झाल्यास सर्वोच्च न्यायालयाकडे वेळ मागणार )

सांस्कृतिक संवाद बळकट करण्यासाठी…
सांस्कृतिक संवाद बळकट करण्यासाठी कलाकार, वास्तुविशारद, डिझाइनर, छायाचित्रकार, संग्राहक, कला व्यावसायिक आणि जनता यांच्यामध्ये एकत्रितरित्या संवाद होणे आवश्यक आहे. यासाठी आय. ए. ए. डी. बी. ची रचना करण्यात आली आहे. यामुळे नवीन कलाकरांना अर्थव्यवस्था वाढीसाठी मदत होईल तसेच याद्वारे कला, वास्तुकला आणि उत्पादकांचे सहकार्य लाभेल, विविध कलांचे पुनरुज्जीवन होण्यास मदत होईल याशिवाय विविध संधी प्राप्त होण्यासाठी कलाकारांना सहकार्य मिळेल. ही उद्दिष्टे साध्या करण्याकरिता या परिषेदेचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.