पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेऊन पाद्यपूजा आणि आरती केली. त्यानंतर आता मोदी निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचं लोकार्पण करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यात पोहोचले आहेत.
येथे सुरुवातील मोदी यांनी निळवंडे धरणाची (Nilavande Dam) हेलिकॉप्टटरद्वारे पाहणी केली. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचं उद्घाटन करण्यात आले.
(हेही वाचा – Israel Hamas War : गाझामध्ये असो वा बाहेर आम्ही हमासचा नाश करूच; पंतप्रधान नेतान्याहू आक्रमक)
पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्या वेळात सभास्थळी पोहोचणार असून त्यांचे भाषण ऐकण्यासाठी शिर्डी अहमदनगर तसेच आजूबाजूच्या गावातील लोकं हजारोंच्या संख्येने मैदानावर पोहोचली आहेत. कडेकोट बंदोबस्तात पोलीस प्रत्येकाची तपासणी करून सोडत आहेत. राज्यातील विविध प्रकल्पांचे, विकासकामांचे लोकार्पणद पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. याकरिता १४ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community