लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार आचारसंहिता लागू होण्यापूर्वी बँक कर्मचाऱ्यांना (Government Bank Employees) मोठी भेट देण्याची शक्यता आहे. सरकार बँक कर्मचाऱ्यांसाठी आठवड्यातून ५ दिवस काम करण्याच्या योजनेला मंजुरी देण्याचा विचार करत आहे.
फायनान्शियल एक्स्प्रेसच्या अहवालानुसार, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बँक युनियन्समध्ये झालेल्या करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांनाही पगारात १७ टक्के वाढ मिळू शकते. बँक संघटनांनी सरकारी कार्यालये, आरबीआय कार्यालये आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाप्रमाणे 180 दिवसांत आठवड्यातून 5 कामाचे दिवस लागू करण्याचे आवाहन केले होते. अहवालानुसार, एका अधिकाऱ्याने सांगितले की, सरकार या प्रस्तावाच्या बाजूने आहे परंतु ‘आठवड्यातील 5 दिवस काम जाहीर करण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत होते आणि कदाचित ती वेळ आता आली आहे.’
(हेही वाचा – Pune Traffic Update: पुणे शहरात मंगळवारपासून होणार वाहतुकीत मोठे बदल, कोणत्या पर्यायी मार्गांचा कराल वापर; जाणून घ्या…)
सध्या सार्वजनिक क्षेत्रातील आणि खासगी क्षेत्रातील बँका महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी काम करतात, मात्र या बदलांना मंजुरी मिळाल्यास बँक कर्मचाऱ्यांना दर शनिवारी सुट्टी दिली जाईल. सरकारने 2015 मध्ये एक अधिसूचना जारी केली होती. ज्यामध्ये 1881 च्या निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ऍक्टच्या कलम 25 अंतर्गत दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी घोषित करण्यात आली होती.
आरबीआयच्या म्हणण्यानुसार,
इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) बँक युनियन्सच्या बैठकीत सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत रोख व्यवहारांसह बँक कर्मचाऱ्यांचे एकूण कामकाजाचे तास दररोज 40 मिनिटांनी वाढवता येतील असा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. 40 मिनिटांच्या वाढीव वेळेत, नॉन-कॅश व्यवहार केले जातील. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, सध्या प्रत्येक बँकेत रविवारी साप्ताहिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 5 दिवस सुट्टीचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर महिन्यातील सर्व शनिवारी कामकाज बंद राहणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community