‘सबका साथ सबका विकास’ हा विश्वकल्याणासाठी एक मार्गदर्शक सिद्धांत ठरू शकतो. भ्रष्टाचार, जातीयवाद आणि सांप्रदायिकतेला आपल्या राष्ट्रीय जीवनात कसल्याही प्रकारचे स्थान नसेल. आपला देश 2047 पर्यंत विकसित राष्ट्र होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. दिल्ली येथे 9 आणि 10 सप्टेंबरला जी-20 संमेलन होत आहे. यानिमित्त पीटीआयला दिलेल्या विशेष मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे वक्तव्य केले.
या संमेलनाविषयी मुलाखतीदरम्यान सविस्तर सांगताना ते म्हणाले की, भारताच्या जी-20 अध्यक्षतेचे अनेक सकारात्मक परिणाम समोर आले आहेत. जगाचा जीडीपी-केंद्रित दृष्टिकोण, आता मानवकेंद्रित होताना दिसत आहे. यात भारत एक महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. जगाने जी-20 मध्ये आपले शब्द आणि दृष्टिकोन केवळ विचारांच्या स्वरुपातच नाही, तर भविष्यातील एक रोडमॅपच्या स्वरुपातही बघितले आहेत. भारताकडे आता एक अब्ज महत्त्वाकांक्षी डोकी आणि दोन अब्ज कुशल हात असलेला देश म्हणून बघितले जात आहे.
(हेही वाचा -)
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीर आणि अरुणाचल प्रदेशात जी-20च्या बैठका आयोजित केल्याच्या मुद्द्यावरून पाकिस्तान आणि चीनचा आक्षेप फेटाळून लावत भारताच्या प्रत्येक भागात बैठक आयोजित होणे स्वाभाविक आहे, असे म्हणत पुढे सांगितले की, आज भारतीय नागरिकांकडे विकासाची पायाभरणी करण्याची एक मोठी संधी आहे. जी पुढील एक हजार वर्षांपर्यंत सर्वांच्याच स्मरणात राहिल. येणाऱ्या काळात भारत जगातील टॉप तीन अर्थव्यवस्थांमध्ये असेल.
Join Our WhatsApp Community