पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सोमवारपासून तीन दिवसाच्या रशिया दौऱ्यावर आहेत. ८ ते १० जुलै २०२४ दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियामध्ये असतील. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मॉस्को विमानतळावर स्वागत करण्यात आले आहे. मोदी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेणार आहेत. या तीन दिवसांत ते रशिया आणि ऑस्ट्रियाला येथे भेट देणार आहेत. तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मोदी यांचा हा दुसरा विदेश दौरा आहे. या कार्यकाळातील हा पहिलाच द्विपक्षीय दौरा आहे. (Narendra Modi Russia Tour)
(हेही वाचा – Kashmir मध्ये चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांनी घराच्या कपाटामागे खोदला बंकर)
आपल्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी केवळ राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचीच भेट घेणार नाहीत तर रशियामध्ये राहणाऱ्या भारतीयांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमातही सहभागी होणार आहेत. याशिवाय त्यांना रशियाचा सर्वोच्च सन्मान सेंट अँड्र्यू ऑर्डर देण्यात येणार आहे. २०१९ मध्ये त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता, आता तो त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
पंतप्रधान मोदी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासोबत भारत आणि रशिया यांच्यातील व्यापार आणि लष्करी सहकार्यावरही चर्चा करतील. भारत रशियाकडून सातत्याने मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची खरेदी करत आहे. त्यामुळे भारताची व्यापारी तूटही वाढत आहे. याबाबतही चर्चा होणार आहे. दोन्ही नेत्यांमधील चर्चेतील मुख्य मुद्दा युक्रेन-रशिया युद्ध असेल. हे युद्ध दोन वर्षांहून अधिक काळ सुरू असून दोन्ही युद्ध करणाऱ्या देशांमध्ये शांततेसाठी कोणतीही चर्चा झालेली नाही. भारताने दोन्ही देशांशी चांगले संबंध ठेवले असून अनेकदा परिस्थिती शांत करण्याचे काम केले आहे. (Narendra Modi Russia Tour)
(हेही वाचा – Terrorist Attack: कठुआत लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, जवानांनी हल्लेखोरांना दिलं जोरदार प्रत्युत्तर)
अमेरिकेसह उर्वरित जगाचेही पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यावर लक्ष लागून आहे. येथे ते राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासोबत भारत-रशिया शिखर परिषदेतही सहभागी होतील. दोन्ही देशांमधील राजनैतिक सहकार्याचे हे सर्वात मोठे व्यासपीठ आहे. २०१९ मध्ये पंतप्रधान मोदींनी यात शेवटचा सहभाग घेतला होता. या भेटीबद्दल पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर लिहिले की, “पुढील तीन दिवसांत मी रशिया आणि ऑस्ट्रियामध्ये असणार आहे. ज्या देशांशी भारताची दीर्घकालीन मैत्री आहे त्यांच्याशी संबंध अधिक दृढ करण्यासाठी ही भेट एक उत्तम संधी असेल. या देशांमध्ये राहणाऱ्या भारतीय समुदायाशी संवाद साधण्यासाठी मी उत्सुक आहे.” (Narendra Modi Russia Tour)
(हेही वाचा – Kashmir मध्ये चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांनी घराच्या कपाटामागे खोदला बंकर)
रशियानंतर पंतप्रधान मोदी युरोपीय देश ऑस्ट्रियालाही भेट देणार आहेत. ४१ वर्षांतील भारतीय पंतप्रधानांचा हा पहिला ऑस्ट्रिया दौरा असेल. पंतप्रधान मोदी ऑस्ट्रियाचे राष्ट्रपती आणि चांसलर या दोघांचीही भेट घेतील आणि व्हिएन्नामध्ये राहणाऱ्या भारतीय समुदायाशीही संवाद साधतील. (Narendra Modi Russia Tour)
हेही पाहा –