- ऋजुता लुकतुके
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांची सोमवारी उशिरा भेट घेतली. भारतात मायक्रोसॉफ्टच्या विस्ताराच्या योजना राबवण्यावर दोघांमध्ये चर्चा झाली. टेक क्षेत्रातील नवीन शोध आणि कृत्रिम बुद्धिमत्ता हे चर्चेचे मुख्य मुद्दे होते. या बैठकीनंतर सत्या नाडेला यांनी ट्विट करून मोदींचे आभार मानले आहेत. ‘मायक्रोसॉफ्टच्या एआय फर्स्ट या भूमिकेला दिलेल्या पाठिंब्याबद्दल भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार, असं नाडेला यांनी म्हटलं आहे. (Narendra Modi-Satya Nadella Meet)
त्यावर पंतप्रधान मोदी यांनी या ट्विटला उत्तर दिलं आहे. ‘मायक्रोसॉफ्टच्या भारतातील गुंतवणूक आणि विस्ताराच्या योजना ऐकून आनंद आणि समाधान वाटलं,’ असं मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. (Narendra Modi-Satya Nadella Meet)
(हेही वाचा – Raj Thackeray यांची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक; म्हणाले, विधानसभेत झाले ते विसरा आणि…)
It was indeed a delight to meet you, @satyanadella! Glad to know about Microsoft’s ambitious expansion and investment plans in India. It was also wonderful discussing various aspects of tech, innovation and AI in our meeting. https://t.co/ArK8DJYBhK
— Narendra Modi (@narendramodi) January 6, 2025
गेल्यावर्षी ३० डिसेंबरला नाडेला यांनी तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांची भेट घेतली होती. हैद्राबादमध्ये मायक्रोसॉफ्टचं भारतातील मुख्यालय आहे आणि इथेच टेक क्षेत्रात मायक्रोसॉफ्ट करू इच्छित असलेल्या नवीन गुंतवणुकीविषयीची ही बैठक होती. त्यानंतर नवीन वर्षात लगेचच नाडेला यांनी पंतप्रधानांची भेट घेतली आहे. (Narendra Modi-Satya Nadella Meet)
हैद्राबाद राज्यांत मायक्रोसॉफ्टचं ६०० मेगावॅट क्षमतेचं डेटासेंटरही आहे आणि भारतातील कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या आता १०,००० वर गेली आहे. आता क्लाऊड कम्प्युटिंग आणि एआय या क्षेत्रातील विकासासाठी नाडेला यांना भारताकडून सहकार्य हवं आहे. (Narendra Modi-Satya Nadella Meet)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community