Narendra Modi: पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण आशियातील ‘या’ पहिल्या महिलेला, कोण आहेत त्या? जाणून घ्या

९ जून रोजी पार पडणाऱ्या पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

307
Narendra Modi: पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण आशियातील 'या' पहिल्या महिलेला, कोण आहेत त्या? जाणून घ्या

आशिया खंडातील पहिल्या महिला रेल्वे चालक म्हणून सुरेखा यादव यांना नवी दिल्ली येथे ९ जून रोजी पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण मध्य रेल्वे आणि महिला कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. (Narendra Modi)

मूळच्या साताऱ्यातील सुरेखा यादव यांनी आशियातील पहिल्या महिला रेल्वे चालक म्हणून नावलौकिक मिळविला आहे. रेल्वेच्या सेवेत त्या ३ दशकांपासून आहेत. महिला विशेष लोकल, डेक्कन क्वीन याचे सारस्थ त्यांच्या हाती होते. त्याचबरोबर घाट भागातील आणि मालगाड्याच्या इंजिनाचे सहाय्यक चालक आणि चालक म्हणूनही त्यांनी काम केले आहे तसेच त्यांनी कल्याण येथील मोटरमन केंद्रात भावी मोटरमनना प्रशिक्षण देण्याचे कामही केले आहे. सध्या मुंबई -सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसच्या सारथ्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. (Narendra Modi)

(हेही वाचा – vivo X Fold3 Pro : विवो कंपनीचा हा नवीन फोन आहे आयफोन पेक्षाही महाग)

९ जून रोजी पार पडणाऱ्या पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवर या शपथविधी सोहळ्याला येणार आहेत, तर या सोहळ्याचे आमंत्रण देशभरातील वंदे भारतच्या चालकांना देण्यात आले आहे. यामध्ये प्रीती साहू, श्रीणी श्रीवास्तव, ऐश्वर्या मेनन, एएसपी तिर्के, स्नेह सिंग बघेल, एन. पारेख, ललिथा कुमार, सुरेंद्र पाल सिंग, सत्य राज मंडल यांचा समावेश आहे तसेच मध्य रेलेमधील वंदे भारतच्या महिला चालक सुरेखा यादव यांचाही त्यात समावेश आहे. दरम्यान एवढ्या मोठ्या शपथविधी सोहळ्याला आमंत्रित केल्याने आनंद गगनात मावेनासा झाला आहे. हा आनंद शब्दांत व्यक्त करता येणार नाही, असे मत सुरेखा यादव यांनी व्यक्त केले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.