स्वातंत्र्यलढ्यातील सशस्त्र क्रांतीचे प्रेरणास्रोत स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ब्रिटिशांनी ५० वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा दिली होती. अत्यंत वेदनादायीस्थितीत ते अंदमानात शिक्षा भोगत होते. याचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘स्वातंत्र्य लढ्यात कारागृहात शिक्षा भोगत असताना वीर सावरकर यांनी चिपळ्यासारख्या हातकड्या वाजवत संत तुकारामांचे अभंग गायले होते.’ पुण्याजवळील देहू येथे १७व्या शतकातील संत तुकाराम महाराज मंदिरात शिळा मंदिराचे उद्घाटन केल्यानंतर वारकरी बांधवांच्या मेळाव्याला ते संबोधित करत होते.
याविषयी विस्तृत विवेचन करताना वीर सावरकर यांचे नातू, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी श्रीमद्भगवत गीता, उपनिषद आदींचा अभ्यास केला होता. त्याप्रमाणे त्यांनी संत तुकाराम यांचे अभंगही वाचले होते. वीर सावरकर आध्यात्मिक विषयांचा अभ्यास करत होते म्हणून काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना त्यांचे मनोबल कणखर राहिले. रत्नागिरी येथे कारागृहात असताना वीर सावरकर यांनी ‘हिंदुत्व’ हा ग्रंथ लिहिला होता. या ग्रंथाचा शेवट त्यांनी संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाने केला आहे, असे रणजित सावरकर म्हणाले.
‘हिंदुत्व’ या ग्रंथातील शेवटचा भाग
‘बावीस कोटी लोक, ज्यांची हिंदुस्थान ही कर्मभूमी आहे, पितृभूमी आहे आणि पुण्यभूमी आहे असला दिव्य इतिहास ज्यांच्यामागे उभा आहे. एक रक्त आणि एक संस्कृती यांच्या सर्वसामान्य बंधनांनी जे बद्ध आहेत असले हे बावीस कोटी हिंदू लोक सर्व जगाला आपले म्हणणे एकावयाला लावतील. असा एक दिवस उगवणार आहे, की ज्यावेळी हे सामर्थ्य जगाच्या प्रत्ययास येणार आहे आणि हेही तितकेच निश्चित आहे की जेव्हा केव्हां ही अशी वेळ येईल तेव्हा हिंदुलोक सर्व जगाला दुसरे तिसरे काही सांगणार नाहीत तर तेच जगाला करावयास सांगतील की जे गीतेने सांगितले. जे बुद्धाने उपदेशिले. ज्या वेळी हिंदु मनुष्य हा हिंदुत्वातीत होतो. त्यावेळेला तो श्रीशंकराचार्यांप्रमाणे ‘वाराणसी मेदिनी’ म्हणून गावयाला लागतो नि श्री तुकाराममहाराजांप्रमाणे ‘आमुचा स्वदेश भुवनत्रयामध्ये वास’ असे गर्जून उठतो. काय म्हणता? माझा स्वदेश? ऐका तर, बंधूंनो! माझ्या देशाच्या मर्यादा म्हणजे, त्रैलोक्याच्या मर्यादा तीच माझ्या देशाची सीमा!’
(हेही वाचा वीर सावरकरांनी कारागृहात संत तुकारामांचे अभंग गायले – पंतप्रधान मोदी
Join Our WhatsApp Community