संत तुकाराम म्हणायचे समाजात उच्च – नीच असा भेदभाव करणे पाप आहे, हा संदेश जेवढा भागवत भक्तीसाठी महत्वाचा तसा तो राष्ट्रभक्तीसाठी महत्वाचा आहे. म्हणून सरकारी योजनांचा समाजातील सर्व घटकांना लाभ मिळत आहे. वारीत पुरुषांबरोबर चालणाऱ्या स्त्रिया हे समानतेचे द्योतक आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुली तोचि साधू ओळखावा, देव तोचि जाणावा, अर्थात समाजातील शेवटच्या पंक्तीत बसलेल्या सरकारी योजनांचा लाभ मिळणे, ही संत तुकाराम महाराजांची शिकवण आहे. दलित, आदिवासी यांचे कल्याण देशाचे प्राधान्य आहे. सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास, हीच संत तुकाराम महाराजांची शिकवण!, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देहू येथे समस्त वारकरी बांधवांना सरकारच्या धोरणांचा आधार संत विचार आहेत, हे स्पष्ट केले.
पुण्यातील देहू येथे संत तुकाराम महाराज यांच्या मंदिर पुनरनिर्माणाचे कार्य करण्यात आले आहे. त्याच्या शिळा लोकार्पणाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि वारकरी संप्रदायाचे संत आदी उपस्थित होते.
संत तुकारामाची शिला बोध आणि वैराग्याचे प्रतीक
देहूत भगवान पांडुरंगाचा निर्णय निवास आहे, याच भावाने मी देहूच्या सर्व नागरिकांना नमन करतो. काही महिन्यापूर्वी मला पालखी मार्गाच्या राष्ट्रीय मार्गाचे चौपदरीकरण करण्याच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली, ३५० किमी चे महामार्ग यामध्ये होणार आहे, यासाठी ११ हजार कोटींचा खर्च होणार आहे, यातून या भागाचा विकास होणार आहे. आज मला देहूतील संत तुकाराम महाराज यांच्या मंदिर शिला लोकार्पणाची संधी मिळाली आहे. जी शिला संत तुकाराम महाराजांच्या बोध आणि वैराग्याचे प्रतीक आहे, ती भक्ती आणि ज्ञानाची आधारशीला आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
(हेही वाचा पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे ‘हा’ वाहतूक मार्ग बंद; ‘या’ पर्यायी मार्गांचा करा वापर)
संतांच्या अभंगाने प्रेरणा मिळत
सध्या देश आझादीचा अमृत महोत्सव साजरा करत आहे, मला अभिमान आहे भारत जगातील प्राचीन संस्कृतीच्या जीवित सभ्यतेचे दर्शक आहेत. याचे श्रेय भारतातील संत, ऋषी मुनी यांना दिले जाते. भारत शास्वत आहे कारण भारत संतांची भूमी आहे, कोणता ना कोणता महान आत्मा या देशात अवतार घेतो. संतांनी आपल्या शाश्वततेला सुरक्षित ठेवले. संत तुकाराम महाराज याची दया, करुणा आणि सेवा आजही अभंगांच्या माध्यमातून आपल्यासोबत आहेत आणि आजही हे अभंग आपल्याला प्रेरणा देतात. जे भंग होत नाही, ते वेळेनुसार शास्वत असतात त्यांना अभंग म्हणतात. आजही देश सांस्कृतिक मूल्यांच्या आधारे पुढे जात आहे तिथे संत तुकाराम महाराज याचे विचार मार्गदर्शन करत आहे. संतांच्या अभंगाने प्रेरणा मिळत आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
शिवरायांच्या जीवनात संत तुकाराम यांची भूमिका महत्वाची
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातही संत तुकाराम महाराज यांनी मोठी भूमिका निभावली आहे. विविध कालखंडात संत तुकाराम महाराज यांचे विचार प्रेरणादायी ठरले. पंढरपूरची वारी, ओडीसातील भगवान जगनाथाची यात्रा, चारधाम यात्रा या सर्व सामाजिक आणि अध्यात्मिक गतिशीलतचे दर्शक आहे. देशभरात होणाऱ्या यात्रा देशाला ऊर्जा देतात, या माध्यमातून भारताला संघटित ठेवले आहे. देशाच्या विविधतेला जोडले आहे. प्राचीन ओळख परंपरा सुरक्षित ठेवण्याचे आपले कर्तव्य आहे. आज पंढरपूर पालखी मार्गाचे आधुनिकीकरण होत आहे, अयोध्येत भव्य राम मंदिर होत आहे, विकास होत आहे. ८ वर्षांत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पंच तीर्थांचा विकास होत आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन होणार आहे, हीदेखील आपल्या संतांचीच कृपा आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
(हेही वाचा पंतप्रधानांचा देहू दौरा! आधी ‘नाठाळाचे माथी…’ आता ‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म…’)
Join Our WhatsApp Community