शेतकरी व शेतीक्षेत्राच्या विकासासाठी स्वातंत्र्यानंतर नरेंद्र मोदी सरकारने कृषी कायदे आणले होते. केंद्र सरकारला नाइलाजाने ते मागे घ्यावे लागले; परंतु सरकार निराश नाही. आम्ही एक पाऊल मागे हटलो आहोत. पुन्हा दोन पावले पुढे जाऊ, असे सांगून ते तिन्ही कृषी कायदे भविष्यात परत येऊ शकतात, असे संकेत केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी शुक्रवारी दिले.
( हेही वाचा :‘या’ कारणामुळे ७ लाख गाड्या वेटींगवर! जाणून घ्या कारण…)
काय म्हणाले कृषीमंत्री
ॲग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. स्वातंत्र्यानंतर कृषिक्षेत्रात खूप काम झाले; परंतु खासगी गुंतवणूक झाली नाही. इतर क्षेत्रात खासगी गुंतवणूक आली. त्याचे फायदेही मिळाले; परंतु खासगी गुंतवणूक न झाल्याने फायदा कृषिक्षेत्राला झाला नाही, असं कृषीमंत्री पुढे म्हणाले.
पुन्हा दोन पावले पुढे जाऊ
केंद्र सरकारने तीन कृषी कायद्यांची घोषणा 2020 ला केल्यानंतर शेतक-यांच्या आंदोलनाला सुरुवात झाली. वर्षभर शेतक-यांच्या आंदोलनावर तोडगा न निघाल्याने, शेवटी सरकारने तीनही कृषी कायदे मागे घेतले. त्यांनतर सरकारने आंदोलक शेतक-यांवरील गुन्हे मागे घेण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर शेतक-यांनी आपले आंंदोलन मागे घेतले. आता यावर नरेंद्र तोमर यांच्याकडून आलेल्या विधानानंतर सरकार कृषी कायदे पुन्हा आणण्याच्या मार्गावर असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
Join Our WhatsApp Community