Sunita Williams यांच्या परतीबद्दल नासाने दिली महत्त्वाची माहिती, किती दिवसात अंतराळवीर पृथ्वीवर परतणार ? वाचा सविस्तर…

सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर यांना घेऊन गेलेलं स्टारलाइनर हे अंतराळयान जूनमध्ये अवकाशात जाण्यासाठी निघाले होते, पण काही तांत्रिक अडचणींमुळे मोहीम उशीरा झाली होती.

214
Sunita Williams यांच्या परतीबद्दल नासाने दिली महत्त्वाची माहिती, किती दिवसात अंतराळवीर पृथ्वीवर परतणार ? वाचा सविस्तर...
Sunita Williams यांच्या परतीबद्दल नासाने दिली महत्त्वाची माहिती, किती दिवसात अंतराळवीर पृथ्वीवर परतणार ? वाचा सविस्तर...

अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने (NASA) अंतराळवीर सुनीता विल्यम्सच्या (Sunita Williams) अंतराळ मोहिमेबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. यापूर्वी वाढवण्यात आलेल्या मोहिमेची परतीची तारीख आणखी वाढण्याची शक्यता आहे. अंतराळयानाची स्थिती चांगली असून ते अधिक काळ कार्यरत राहू शकते असे नासाने (NASA) म्हटले आहे.

सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर यांना घेऊन गेलेलं स्टारलाइनर हे अंतराळयान जूनमध्ये अवकाशात जाण्यासाठी निघाले होते, पण काही तांत्रिक अडचणींमुळे मोहीम उशीरा झाली होती. त्यानंतर अंतराळयानाला आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर (ISS) डॉक करण्यात आलं, मात्र, हेलियम लीक (Helium Leak)ची समस्या आल्याने हे दोन्ही अंतराळवीर तेथेच अडकून राहिले आहेत. सुरुवातीला ही अंतराळ मोहीम एक आठवड्याची असणार होती; पण आता या मिशनची मुदत तब्बल ४५ दिवसांनी वाढण्याची शक्यता आहे. नासाच्या कॉमर्शियल क्रू प्रोग्रामचे व्यवस्थापक स्टीव्ह स्टिच यांनी ही माहिती दिली आहे.

(हेही वाचा – व्‍हॉट्‍सअ‍ॅपवरील ‘Meta AI’ कडून हिंदूंच्या देवतांचा सर्रास अपमान; माफी मागण्याची हिंदूंची मागणी)

परतीची तारीख अद्याप निश्चित नाही…
अंतराळयानाच्या बॅटरीज चांगल्या स्थितीत असून त्या आणखी काळ टिकू शकतात असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु परतीची तारीख अद्याप निश्चित झाली नाहीये. अंतराळयानाच्या इंजिनमध्ये काही अडचणी आल्याने त्यांची तपासणी करण्यासाठी न्यू मेक्सिको (New Mexico)येथे चाचण्या घेतल्या जाणार आहेत. या चाचण्यांच्या अहवालानुसार, अंतराळयानाची परतीची तारीख लवकरच निश्चित केली जाईल असं नासाने सांगितलं आहे.

सुरक्षेची कोणतीही चिंता नाही
“आम्ही अंतराळयानाला घाईघाईने परत आणण्याच्या विचारात नाही आहोत,” असंही स्टीव्ह स्टिच यांनी स्पष्ट केलं. सुनीता विल्यम्स आणि सहकाऱ्यांची अंतराळातील वाटचाल वाढण्याची शक्यता असून त्यांच्या सुरक्षेची कोणतीही चिंता नसल्याचं नासाने आश्वासन दिलं आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.