नासाने युएफओ आणि एलियन्ससंबंधी मेक्सिकोवरील एका घटनेबाबत सादर केलेल्या अहवालासंदर्भात भाष्य केलं आहे. मेक्सिको येथील संसदेत काचेच्या पेटीत दोन जीवाश्म अवशेष करण्यात सादर करण्यात आले. यूएफओ शास्त्रज्ञ जेमे मॉसन यांनी हे जीवाश्मांचे अवशेष एक हजार वर्षे जुने असून ते ‘एलियन’ असल्याचं मॉसन त्यांचं म्हणणं आहे. या दाव्याला नासाने उत्तर दिलं आहे.
जगभरात एलियन्स आणि युएफओसंबंधी मागील अनेक काळापासून एलियन्स आणि युएफओसंबंधी अनेक रहस्ये असून त्यांचा उलगडा झालेला नाही. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मेक्सिकोच्या संसदेत दोन मृतदेह (जीवश्मांचे अवशेष) ठेवण्यात आले होते. हे एलियन्सचे असल्याचा दावा यावेळी करण्यात आला होता.
(हेही वाचा – Ravindra Jadeja : रवींद्र जाडेजाची कपिल देवच्या ‘या’ विक्रमाशी बरोबरी )
मेक्सिकोच्या संसदेत काचेच्या पेटीतील हे जीवाश्म् अवशेष सादर करण्यात आले होते. त्यावर स्वयंघोषित यूएफओ शास्त्रज्ञ जेमे मॉसन यांनी हे जीवाश्म एक हजार वर्षे जुने आणि एलियन असल्याचा दावा मॉसन यांनी केला होता. याविषयी पत्रकार परिषदेत नासाच्या अधिकाऱ्यांना याबद्दल विचारण्यात आलं. प्रिन्स्टन विद्यापीठाच्या खगोल भौतिकशास्त्र विभागाचे माजी प्रमुख आणि यूपीए अहवालाचे अध्यक्ष डेव्हिड स्पर्गेल यांनी आपल्याला या नमुन्यांबद्दल काही माहिती नसल्याचं सांगितलं तसेच यासंदर्भात पारदर्शकता ठेवली जावी, असाही आग्रह केला आहे.